गॅलक्सी A8sची फिचर्स एकदम हटके, लवकरच भारतात
सॅमसंग गॅलेक्सी A8s ग्राहकांना आकर्षित करणारा स्मार्टफोन ठरणार आहे.
भारतात सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. नेहमी ग्राहकांसमोर नवीन फिचर्सचे स्मार्टफोन सादर करुन सॅमसंग एक वेगळी ओळख निर्माण करतो आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी A8s स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मात्र, भारतात या फोनची विक्री अद्याप सुरु झालेली नाही. ३१ डिसेंबरपासून चीनमधील एका वेबसाईटच्या माध्यमातून या फोनची खरेदी करता येणार आहे. चीनमध्ये या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगसाठी JD.com वेबसाईटची मदत घेऊ शकता.
गॅलेक्सी A8s स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी A8s ग्राहकांना आकर्षित करणारा स्मार्टफोन ठरणार आहे. फोनमध्ये ३ रिअर कॅमेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्राइमरी सेंसर २४ मेगापिक्सल आहे. इतर दोन कॅमेऱ्यांमध्ये अनुक्रमे १० मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल देण्यात आले आहे. ६ जीबी रॅम असलेल्या फोनची प्री-बुकिंगची सुरुवात करण्यात आली आहे. चीनमध्ये गॅलेक्सी A8s स्मार्टफोनची किंमत चिनी २९९९ युआन आहे. परंतु, भारतात या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.२ फुल एचडी असणार आहे. तसेच स्मार्टफोनमधील स्टोअरेज १२८ जीबी असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये फिंगर प्रिंट सेंसर लावण्यात आला आहे.
स्मार्टफोनची बॅटरी
स्मार्टफोनची बॅटरीची क्षमता ३४०० एमएएच आहे. हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला पूरक आहे.