Amazon Prime Day Sale 2024: दमदार परफॉर्मन्स, दीर्घकाळ टीकणारी बॅटरी, कॅमेराप्रमाणं फोटो टीपता येण्याचं कौशल्य अशा एखाद्या मोबाईलच्या शोधात असाल, तर तुमचा शोध आता अंतिम टप्प्यात आला आहे असंच समजा. कारण, अॅमेझॉनवर सुरु असणाऱ्या अनेक सवलती तुम्हाला नवा फोन आणि तोसुद्धा कमी दरात खरेदी करण्याची संधी देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉनवरील या Sale मध्ये अनेक गॅजेटप्रेमींना  Samsung Galaxy S23 Ultra 5G खरेदी करण्याची एक कमाल संधी मिळत आहे. जबरदस्त कॅमेरा आणि परफॉर्मन्स असणआरा हा फोन 12GB आणि 256GB स्टोरेजच्या व्हेरिएंटमध्ये अॅमेझॉनच्या या सेलमध्ये 79,999 रुपयांना उपलब्ध आहे. 2023 मध्ये हाच स्मार्टफोन 1,24,999 इतक्या दणदणीत किमतीत लाँच झाला होता. 


अॅमेझॉनवरून खरेदी करताना या फोनसाठी तुमच्याकडे बँकेची ऑफर असल्यास तुम्ही आणखी 1000 रुपयांची बचत करू शकता. म्हणजेच हा फोन 78,999 रुपयांना खरेदी करण्याची मुभा दिली जात आहे. 


35 हजारांनाही मिळतोय हाच फोन? 


महत्त्वाचं म्हणजे या फोनवर तुम्ही आणखी तगडी बचतही करु शकता. इथं एक्सचेंज ऑफरचा तुम्हाला थेट फायदा मिळणार आहे. ज्या मदतीनं तुमच्या तब्बल 44 हजार रुपयांची बचत होईल असं सांगितलं जात आहे. तुम्ही एक्सचेंज करत असणाऱ्या मोबाईलची सुस्थिती आणि कार्यक्षमता लक्षात घेऊनच ही ऑफर लागू केली जाणार आहे, ज्यामुळं तुम्ही सॅमसंगचा हा लाखामोलाचा फोन 35 रुपयांना खरेदी करू शकता. 


हेसुद्धा वाचा : Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला 


Apple iPhone 13


अॅमेझॉनच्या या ऑफरमध्ये अॅपलचा आयफोन 13 अवघ्या 47799 रुपयांना उपलब्ध असून, बँक आणि एक्सचेंज ऑफरअंतर्गत हा फोन 44050 रुपयांना मिळू शकतो. इथं तुम्हाला नो कॉस्ट इएमआयचा पर्याय निवडूनही रक्कम भरता येऊ शकते. 


POCO M6 Pro 5G


50MP + 2MP चा ड्युअल प्रायमरी कॅमेरा, Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी बॅकअप असणारा हा फोन अॅमेझॉनवर अवघ्या 9998 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. काय मग, तुम्ही यापैकी कोणता फोन खरेदी करायच्या विचारात आहात?