Samsung चा `हा` फोन iPhone 14 शी करेल स्पर्धा, फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात है!
आयफोन 14 लाँच होण्यापूर्वीच सॅमसंगने कंबर कसली आहे. सॅमसंग लवकरच जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे.
Samsung Galaxy S23 Ultra: गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ एक धडाधड स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे कोणता मोबाईल घ्यायचा? असा प्रश्न मोबाईलप्रेमींसमोर असतो. त्यात आयफोन सीरिजचा क्लास वेगळाच असून यासारखा फोन असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सध्या मोबाईप्रेमींमध्ये आयफोन 14 बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमी चातकासारखी या फोनची वाट पाहात आहे. असं असताना आयफोन 14 लाँच होण्यापूर्वीच सॅमसंगने कंबर कसली आहे. सॅमसंग लवकरच जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग Galaxy S23 Ultra हा 200 मेगापिक्सल असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. दक्षिण कोरियन कंपनीने यापूर्वी 200 मेगापिक्सल ISOCELL ने HP1 आणि HP3 सेन्सर लाँच केले आहेत. तथापि, यापैकी कोणतेही सेन्सर S23 Ultra मध्ये नसतील. पण विश्वसनीय टिपस्टर आइस युनिव्हर्सच्या मते, हे अघोषित ISOCELL HP2 कॅमेरा सेन्सरने सुसज्ज असेल.
Samsung Galaxy S23 Ultra Leaks
टिपस्टरचा दावा आहे की, Galaxy S23 Ultra मध्ये अघोषित HP2 सेन्सर असेल. HP2 सेन्सरचे तपशील अद्याप ज्ञात नाहीत. सॅमसंग फक्त त्याच्या अल्ट्रा-ब्रँडेड फ्लॅगशिपवर HP2 सेन्सर वापरेल. HP1 आणि HP3 कॅमेरा सेन्सर Galaxy A-सिरीज आणि चीनी ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असतील. Galaxy S23 Ultra मध्ये प्राथमिक कॅमेरा म्हणून ISOCELL HP2 असेल. यात 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स, 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो कॅमेरा आणि 10x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 10MP पेरिस्कोप झूम कॅमेरा असेल. Galaxy S23 Ultra च्या फ्रंट कॅमेर्याबद्दल कोणतीही माहिती नाही. 40-मेगापिक्सेल कॅमेरा अण्याची शक्यता आहे, जो ऑटोफोकस आणि 60fps 4K व्हिडीओ शूटिंग सारख्या वैशिष्ट्यांसह येतो. S23 Ultra मध्ये आगामी स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 असण्याची अपेक्षा आहे. परंतु त्याच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल माहिती नाही.
Galaxy S23 Ultra Launch Date
सॅमसंगचा Galaxy S23 Ultra Q1 2023 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus सोबत असेल, अशी शक्यता आहे. सध्या कंपनी Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4, Galaxy Watch 5 सीरिज आणि काही प्रोडक्ट्सचं अनावरण करेल.