सॅमसंग गॅलॅक्सी टॅब ए २०१७ भारतात लॉन्च...
टॅबची क्रेझ कमी होत चाललेली असताना सॅमसंग कंपनीने नाव टॅब भारतीय बाजारात लाँच केला आहे.
नवी दिल्ली : टॅबची क्रेझ कमी होत चाललेली असताना सॅमसंग कंपनीने नाव टॅब भारतीय बाजारात लाँच केला आहे. गॅलॅक्सी टॅब ए २०१७ असे या मॉडेलचे नाव आहे. याची किंमत १७,९९० इतकी आहे. बिक्सबी होम फीचर असलेला हा टॅबलेट ८ इंचाचा आहे. सॅमसंग इंडियाचे डिरेक्टर विशाल कौर यांनी सांगितले की, ग्राहकांचे मत आणि मागणी लक्षात घेऊन नव्या टॅब्लेटच्या लूक, मल्टिमीडिया आणि डिस्प्ले वर लक्ष दिले आहे. जाणून घेऊया टॅबलेटची खासियत.
डिस्प्ले : गॅलॅक्सी टॅब ए मध्ये ८ इंचाचा डिस्प्ले आणि १.४ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसर आहे. सॅमसंगच्या नव्या टॅबमध्ये २जीबी रॅम, १६ जीबी मेमरी आहे. ही मेमरी मायक्रोएसडी कार्ड वापरून २५६ जीबी पर्यंत वाढवता येईल.
अॅनरॉईड : गॅलॅक्सी टॅब ए २०१७ हा टॅब अॅनरॉईड नूगा वर चालतो. फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी यात अपर्चर एफ/१.९ आणि एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे. याचा फ्रंट कॅमेरा अपर्चर एफ/२.२ असून ५ मेगापिक्सल कॅमेरा आहे. कमी उजेडात देखील या टॅबमधून उत्तम फोटोज येतील, असा दावा कंपनीने केला आहे.
खास ऑफर : गॅलॅक्सी टॅब ए च्या युजर्सना रिलायन्स जिओतर्फे एका वर्षासाठी १८० जीबी पर्यंत अधिक ४जी डेटा मिळेल. या टॅबचे वजन ३६४ ग्रॅम आहे. यात ५००० mAh ची बॅटरी आहे.
खास फीचर : टॅबमध्ये दोन खास फीचर्स आहेत. एक ब्लू लाइट फिल्टर ज्यामुळे ब्लू लाइट इमिशन कमी होते. दुसरं स्मार्ट व्यू ज्यामुळे हा टॅब टीव्ही सोबत वायरलेस कनेक्ट होऊ शकतो आणि टॅबमधील व्हिडीओ, फोटोज आणि इतर कन्टेन्ट मोठ्या स्क्रीनवर बघू शकता.
गॅलॅक्सी टॅब ए चे कॉर्नर चौकोनी असल्याने टॅब हातात पकडणे सोपे होईल. मेटल बॅक डिव्हाईसमुळे टॅबला प्रीमियम लूक येतो. कॅमेऱ्यात एक एचडीआर मोड देखील आहे.