Samsung Launches Crystal 4K Neo TV with Free OTT Subscriptions: कोरोनामुळे बहुतेक लोक घराबाहेर शक्यतो टाळतात. असा परिस्थितीत  चित्रपट आणि कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला तुमचा टीव्ही अपडेट करायचा असेल, तर सॅमसंगने नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही कमी किमतीत अप्रतिम फीचर्ससह येतो. तसेच मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन देखील दिलं आहे. चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगने Crystal 4K Neo TV हा नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉप, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून हा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीची किंमत 35,990 रुपये आहे आणि तुम्ही 12 महिन्यांच्या विनाखर्च EMI वर देखील खरेदी करू शकता.


हा टीव्ही खरेदी केल्यावर तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन दिले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही Flipkart वरून Samsung Crystal 4K Neo TV खरेदी केला तर तुम्हाला Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.


हा स्मार्ट टीव्ही 43-इंचाच्या 4K डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला HDR10+ सपोर्ट, बेझल-लेस डिझाइन आणि इमर्सिव अनुभव मिळेल. हा स्मार्ट टीव्ही शक्तिशाली क्रिस्टल प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑटो गेम मोड आणि मोशन एक्सलेटर सपोर्ट देखील दिला गेला आहे.


सॅमसंगच्या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला डॉल्बी डिजिटल प्लसचा साउंड सपोर्ट दिला गेला आहे. यामुळे तुम्ही थ्रीडी आवाजाचाही आनंद घेऊ शकाल. याशिवाय या टीव्हीमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह साउंड फीचर आणि एक उत्तम म्युझिक प्लेयर देखील देण्यात आला आहे. तुम्ही या टीव्हीमध्ये गाना अ‍ॅप देखील अ‍ॅक्सेस करू शकता. हा स्मार्ट टीव्ही इन-बिल्ट व्हॉईस असिस्टंट सपोर्टसह येतो ज्यात अलेक्सा आणि बिक्सबी यांचा समावेश आहे.


'युनिव्हर्सल गाइड'मुळे तुम्ही तुमचे आवडते शो आणि चित्रपट सहज शोधू शकता. त्याच्या 'टीव्ही प्लस मोड'मध्ये 55 जागतिक आणि स्थानिक लाइव्ह चॅनेल दिले आहेत. तुम्ही सॅमसंग टीव्ही प्लसवर विनामूल्य लॉग इन करून प्रवेश करू शकता. या टीव्हीच्या 'पीसी मोड'च्या मदतीने तुम्ही एका चुटकीसरशी वैयक्तिक संगणकात बदलू शकता.