नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी एम सीरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगकडून 'गॅलेक्सी एम ३०' लॉन्च करण्यात आला आहे. याआधी सॅमसंगकडून एम सीरीजचे 'एम १०' आणि 'एम २०' लॉन्च करण्यात आला होता. 'एम १०' आणि 'एम २०' प्रमाणे 'गॅलेक्सी एम ३०' ऑनलाईन बाजारात उपलब्ध होणार आहे. ७ मार्चला दुपारी १२ वाजता अमेझॉन.इन आणि सॅमसंग ई-शॉपवर सॅमसंग 'गॅलेक्सी एम ३०'ची विक्री सुरू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत 'सॅमसंग गॅलेक्सी एम ३०'ची वैशिष्ट्ये -


- ऍन्ड्रॉइड ८.१ ओरिओ 
- ६.४ इंची एचडी डिस्प्ले
- ऑक्टा कोर एक्सनोस ७९०४ प्रोसेसर
- १३ मेगापिक्सल + ५-५ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 
- ५००० mAh बॅटरी 
 
भारतीय बाजारात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट सॅमसंग 'गॅलेक्सी एम ३०' ची किंमत १४,९९० रूपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७,९९० रूपये इतकी आहे. ग्रेडिएशन ब्लॅक आणि ग्रेडिएशन ब्लू या दोन रंगात सॅमसंग 'गॅलेक्सी एम ३०' उपलब्ध होणार आहे. 'एम ३०' सॅमसंगच्या एम सीरीजमधील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे.