Best Smartphone : धमाकेदार फीचर्स असलेला आणि तगडी बॅटरी असलेला सॅमसंग कंपनीचा नवा स्मार्टफोन सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. Samsung नुकताच Samsung Galaxy A04s हा स्मार्टफोन लॉंच करुन ग्राहकांना आकर्षित केलं आहे. उत्तम बॅटरी, हाय क्वालिटी कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत देखील कमी आहे.


Samsung Galaxy A04s Specifications


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Samsung Galaxy A04s मध्ये HD+ रिझोल्यूशन आणि वॉटरड्रॉप नॉचसोबत 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. हा 90Hz चा रिफ्रेश रेट देतो आणि स्क्रीन गोरिल्ला ग्लास 3 द्वारे प्रोटेक्ट करतो. डिव्हाइसच्या पॉवर बटणामध्ये साइड-माउंट केलेलं फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.


Samsung Galaxy A04s Camera


ऑप्टिक्स फ्रंटवर, Samsung Galaxy A04s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मेन सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP पोर्ट्रेट युनिट उपलब्ध आहे. त्याचबरोबर, 5MP फ्रंट फेसिंग सेल्फी कॅमेरा आहे.


Samsung Galaxy A04s Batter


Galaxy A04s हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन 3GB आणि 4GB RAM मध्ये 32GB, 64GB आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करता येतो. 1TB पर्यंत अतिरिक्त स्टोरेजसाठी microSD कार्ड स्लॉट सपोर्ट आहे. 15W जलद चार्जिंगसाठी सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 12 OS वर आधारित OneUI 4.1 वर चालतो. या स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh आहे.


Samsung Galaxy A04s Features


Galaxy A04s च्या कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल सिम, 4G, WiFi-5 आणि Bluetooth 5 यांचा समावेश आहे. Samsung Galaxy A04s ब्लॅक, ग्रीन, व्हाईट आणि कॉपर कलरमध्ये मिळतो. स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती नाही, पण डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे आणि स्वीडनमधील ब्रँडच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये ते सूचीबद्ध आहे.