मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असलेला मोबाईल फोन आणणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या प्लॅटफॉर्मवर तशी माहिती मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लॅटफॉर्मवर चाचणीसाठी दाखल झालेल्या हँडसेटवरून, नव्या स्मार्टफोनमध्ये एक्झोनस 8895 मोबाईल प्रोसेसर आणि 6 जीबी 'रॅम' आहे, असे  दिसते. 


Geekbench वरील माहितीचे तपशील Telefoon.nl या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे त्यामधील माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मोबाईल हँडसेट 6.3 इंचाचा असेल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये अँड्रॉईडची 7.1.1 ही आवृत्ती असेल. 


खालील फीचर्स असतील


मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
3 हजार मिली अँप अवर (mHA) इतकी बॅटरीची क्षमता
मोबाईलमध्ये 64 जीबी इंटर्नल स्टोअरेज
वायरलेस चार्जिंगची सुविधा
12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
सुमारे 75 हजार रूपये किंमत