मुंबई : Samsung Flex Note Device A Foldable Tablet: मोबाईल फोनमध्ये नोकीयाचा दबदबा होता. त्यानंतर मार्केटमध्ये Samsungने धुमाकूळ घातला. सामान्य स्मार्टफोनसोबतच सॅमसंगने इतरही अनेक उत्पादने बनवली आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन्सना आज बाजारात खूप पसंती दिली जात आहे आणि त्यापैकी पहिला ब्रँड ज्याचे नाव घेतले जाते ते सॅमसंग आहे. हा ब्रँड आता फोल्डेबल स्मार्टफोनसह फोल्ड करण्यायोग्य टॅबलेट, सॅमसंग फ्लेक्स नोटवर काम करत आहे. चला या Foldableटॅब्लेटबद्दल सर्व काही जाणून घेऊया.


सॅमसंग फोल्डेबल टॅबलेटवर काम  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडे, अमेरिकेमध्ये आयोजित केलेल्या SID 2022 डिस्प्ले वीकमध्ये, सॅमसंग डिस्प्ले टेक्नॉलॉजीजने सॅमसंग फ्लेक्स नोट हे नवीन उपकरण सादर केले, जे फोल्ड करण्यायोग्य गॅझेट्समध्ये एक अतिशय नवीन आणि उत्कृष्ट पाऊल ठरु शकते.  Ice Universe च्या एका रिपोर्टमध्ये या Foldable Tabletबाबत माहिती मिळाली असून त्यांनी ही माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे.


पहिल्या लूकवर चाहते फिदा


Samsung Flex Note हा फोल्ड करण्यायोग्य टॅबलेट (Foldable Tablet) आहे आणि त्याची माहिती Ice Universe ने Twitter द्वारे दिली आहे. या ट्विटमध्ये या डिव्हाईसच्या माहितीसोबतच टॅबलेटची काही छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ज्यांना पाहून चाहते खूश आहेत आणि या डिव्हाइसच्या लॉन्चची वाट पाहत आहेत. सॅमसंगच्या ऑनलाइन न्यूजरूमच्या माध्यमातून ही छायाचित्रे समोर आली आहेत.


सॅमसंग फ्लेक्स नोटची अप्रतिम रचना


छायाचित्रांवरून अंदाज लावला जाऊ शकतो की सॅमसंगचा हा टॅबलेट सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Tablet) सीरिज, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड सारख्याच डिझाइनसह लॉन्च केला जाऊ शकतो. हा टॅबलेट विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करु शकतो, असे मानले जात आहे.


सॅमसंग फ्लेक्स नोटची उत्कृष्ट वैशिष्ट्ये


सॅमसंगच्या या टॅबलेटचे (Foldable Tablet) खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ते फोल्ड केले जाते तेव्हा त्याचा कीबोर्ड स्क्रीनवरून आपोआप हलतो ज्यामुळे वापरकर्त्याला व्हिडिओ किंवा फोटो पाहण्यासाठी मोठी स्क्रीन मिळू शकते. तसेच, सॅमसंग फ्लेक्स नोटचा किबोर्ड आरामात कस्टमाईज केला जाऊ शकतो, असा अंदाज या छायाचित्रांवरुन वर्तवला जात आहे. हे आरजीबी किबोर्ड किंवा पेस्टल रंगीत किबोर्ड म्हणून वापरले जाऊ शकते आणि ते टॅब्लेटच्या सेटिंग्जमधून सहजपणे केले जाऊ शकते.  सध्या सॅमसंग फ्लेक्स नोटबाबत अशाच गोष्टी समोर आल्या आहेत.