जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : रंगरूपावरून कुणालाही कमी लेखू नका, कारण काळ्या मुलांना नकार देणाऱ्या, तसेच सरकारी नोकरीवाल्यालाच सुंदर बायको मिळते, असं म्हणणाऱ्यांचे डोळे पांढरी करणारी ही बातमी आहे. काळ्या मुलांचं कर्तृत्व देखील चकाकणारं असतं. 'दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ', असंच काहीसं म्हणावंस तुम्हालाही वाटेल, त्या आधी जाणून घ्या, हा किस्सा आहे तरी काय?


सरकारी नोकरीचे फायदे आणि सत्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुसंख्य भारतीयांना गोऱ्या रंगाबद्दल अधिक आकर्षण आहे, हे लपून राहिलेलं नाही. सरकारी नोकरी असली, की तुमचा रंग कसाही असो, तुम्हाला सुंदर, त्यातल्या त्यात गोऱ्या रंगाची बायको मिळते, असा जोक असलेला मेसेज तुम्ही व्हॉटसअॅपवर पाहिला असेल,  वरील फोटोसोबत 'सरकारी नोकरीचे फायदे' असा लिहिलेला फोटो, व्हॉटसअॅपवर प्रचंड व्हायरल होतोय.


सुंदर असणं, सर्वकाही नसतं


मात्र या फोटोतल्या तरूणाची कामगिरी जाणून घेतली, तर तुम्ही सरकारी नोकरीचा जोक तर नक्कीच विसराल, तसेच तुम्हाला या मुलाविषयी आदर देखील वाटेल, एवढी प्रेरणादायी आणि कमी वयात साकारलेली कारकीर्द आहे.


हा काळा मुलगा आहे, आणि सरकारी नोकरी मिळाल्यामुळे त्याचं लग्न गोऱ्या सुंदर मुलीशी झालं आहे, एवढंच आपल्याला 'व्हॉटसअॅप'चा मेसेज पाहून वाटत होतं.  तर हा २९ वर्षाचा अॅटली कुमार हा दाक्षिणात्य चित्रपट निर्माता आहे. 


या युवा दिग्दर्शकाला दक्षिणेत सध्या तोड नाही


अॅटलीने २०१६ साली 'रजनी राजा' या प्रसिद्ध चित्रपटाची निर्मिती केली, आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. अॅटली कुमार हा कमी वयात अब्जाधीश झाला आहे, तो 'रजनी राजा'  सिनेमामुळेच. कारण या सिनेमाचा बजेट होता १५ कोटी आणि या सिमेमाने कमावले १०० कोटी. अॅटलीची  यूट्यूबवर MUGAPUTHAGAM शॉर्ट फिल्म चांगलीच प्रसिद्ध आहे. अॅटलीने मित्रांसोबत अनेक शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.


कर्तबगार मुलगा


अॅटलीने रजनीकांत यांच्या रोबोट सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं, दक्षिणेतले प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत ५ वर्ष सिनेनिर्मितीसाठी काम केलं.


सर्वात महत्वाचं अॅटलीबरोबर ती कोण?


एवढं सांगूनही तुमच्या मनात एक प्रश्न अजून घोळ घालत असेल, मग त्याच्यासोबत फोटोत आहे, ती आहे तरी कोण? तर ती अभिनेत्री क्रिष्णप्रिया आहे, अॅटली आणि तिची ओळख २००८ पासून आहे, २०१६ साली त्यांनी लग्न केलं, क्रिष्णप्रियाने विजयाटीव्हीमधील एका मालिकेत भूमिका साकारली आहे, तिने कन्नड रिअॅलिटी शोमध्येही काम केलं, तिने प्रसिद्ध तमिळ सिनेमा सिघम देखील साकारला.