नवी दिल्ली : आता कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्डने पेमेंट करण्याची काही गरज नाही. अथवा कोणत्याही मोबाईल ऍपची देखील गरज नाही. आता वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला घड्याळ्याच्या (Wrist Watch) माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्शभूमीवर देशातील प्रसिद्ध Titan कंपनीने पहिल्यांदा कॅन्टॅक्टलेस (Contactless Payment) घड्याळ तयार केलं आहे. या वैशिष्ट्यासाठी कंपनीने भारतीय स्टेट बँकसह  (एसबीआय) भागीदारी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेदी केल्यानंतर, जेव्हा तुम्ही पेमेंट करण्यासाठी पोहोचाल तेव्हा PoS मशीनवर Titan Pay Powered Watchने टॅप केल्यानंतर कॅन्टॅक्टलेस घड्याळने पेमेंट करता येईल. अशा प्रकारे पेमेंट करण्याची सुविधा फक्त एसबीआय बॅक धारकांकडे असणार आहे.  कंपनीकडून घडाळ्यासाठी देण्यात आलेला हा नवा फिचर खास सिक्यॉर्ड सर्टिफाइड नियर-फील्ड कम्यूनिकेशन चिपद्वारे (NFC) काम करतो. 


या घडाळ्याच्या माध्यमातून तुम्हाला २ हजार रूपयांपर्यतची शॅपिंग करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पेमेंट करताना तुम्हाला ओटीपीची  देखील गरज भासणार नाही. परंतु २ रूपयांपेक्षा जास्त शॉपिंग केल्यास तुम्हाला ओटीपी द्यावा लागेल. 


दरम्यान, देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे टायटन कंपनीने तयार केलेले घड्याळ येत्या काळात फार उपयोगी पडणार आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे देखील पालन होणार आहे.