Sedan Car Demand Decrease In Market: गेल्या काही वर्षात ऑटोक्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता इलेक्ट्रिक कार बाजारात येत आहेत. या गाड्यांमध्ये  हॅचबॅक (Hachback), सेडान (Sedan), एमपीव्ही (MPV) आणि एसयूव्ही (SUV) असे प्रकार आहेत. देशात छोट्या हॅचबॅक कार्सना मोठी मागणी आहे. तसेच एसयूव्ही सेगमेंटमध्येही मागणी वाढली आहे. मात्र गेल्या काही वर्षातील आकडेवारीनूसार सेडान कार घेण्याऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्येही ही घट दिसून आली. देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादी पाहता पहिल्या 25 गाड्यांमध्ये फक्त एका सेडान मॉडेलचा समावेश आहे. या यादीत हॅचबॅक आणि एसयूव्हीचा समावेश आहे. 


नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या 25 गाड्यांची यादी


  1. COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मारुति बलेनो (हॅचबॅक)

  2.  टाटा नेक्सन (एसयूव्ही)

  3.  मारुति ऑल्टो (हॅचबॅक) 

  4. मारुति स्विफ्ट (हॅचबॅक)

  5. मारुति वैगनआर (हॅचबॅक)

  6. मारुति डिजायर (सेडान) 

  7. मारुति अर्टिगा (एमपीव्ही) 

  8. ह्युंदाई क्रेटा (एसयूव्ही)

  9. टाटा पंच (एसयूव्ही) 

  10. मारुति ब्रेजा (एसयूव्ही)

  11. ह्युंदाई वेन्यू (एसयूव्ही)

  12. किआ सेल्टोस (एसयूव्ही)

  13. महिंद्रा बोलेरो (एसयूव्ही) 

  14. ह्युंदाई ग्रैंड आई10 (हॅचबॅक) 

  15. किआ सोनेट (एसयूव्ही)

  16. ह्युंदाई आई20 (हॅचबॅक)

  17. मारुति ईको (व्हॅन), 

  18. महिंद्रा स्कॉर्पियो (एसयूव्ही) 

  19. किआ कैरेंस (एसयूव्ही), 

  20. महिंद्रा एक्सयूवी300 (एसयूव्ही)

  21. महिंद्रा एक्सयूवी700 (एसयूव्ही)

  22. टाटा टियागो (हॅचबॅक) 

  23. मारुति इग्निस (हॅचबॅक)

  24. टाटा अल्ट्रोज ​​(हॅचबॅक)

  25. मारुति ग्रैंड विटारा (एसयूव्ही)


बातमी वाचा- Maruti Suzuki ने विक्री केलेल्या 9 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या, कारण...


वरील यादी पाहता यात फक्त एका सेडान कारचा समावेश आहे. मारुति डिझायरचं नाव या यादीत आहे. मारुति सुझुकीच्या 14456 यूनिट्सची विक्री नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. तर होंडा सिटी, ह्युंदाई वरना, मारुति सियाज, स्कोडा स्लाविया आणि फॉक्सवॅगन वर्टुस या गाड्या यादीत स्थान मिळवू शकल्या नाहीत. दुसरीकडे स्कोडा स्लाविया आणि फॉक्सवॅगन वर्टुस या वर्षी लाँच केली आहे. त्यामुळे देशात सेडान कारची मागणी घटत असल्याचं दिसत आहे. सेडानच्या तुलनेत एसयूव्ही ऑफ-रोडसाठी चांगला पर्याय आहे. स्पोर्टी स्टाइलने ग्राहकांना या गाड्या खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. त्याचबरोबर किंमतीत फारसा फरक नसल्याने सेडान ऐवजी एसयूव्ही खरेदीला पसंती देतात.