श्रद्धा कपूरने लॉन्च केले नवीन अॅप...
आजकाल आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशी जोडण्यासाठी प्रत्येकजण सोशल नेटवर्कींग साईट्स, अॅप्सची मदत घेतात.
नवी दिल्ली : आजकाल आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशी जोडण्यासाठी प्रत्येकजण सोशल नेटवर्कींग साईट्स, अॅप्सची मदत घेतात.
नवीन अॅप लॉन्च
मात्र प्रत्येक सोशल नेटवर्कींग अॅप्सच्या काही मर्यादा असतात. वेगवेगळ्या अॅपवर वेगवेगळ्या लोकांचा ग्रूप आहे. हे लक्षात घेऊन नवा सगुन अॅप लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशी संपर्कातही राहू शकता आणि कमाई ही करू शकता.
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते लॉन्चिंग
या अॅप अभिनेत्री श्रद्धा कपूरने लॉन्च केला. त्यावेळी ती बोलली की, या प्रोजेक्टशी जोडले गेल्यामुळे खूप आनंदीत, उत्साहीत आहे. त्यामुळे व्यस्त जीवनशैलीतील लोकांच्या गरजा पूर्ण करेल. सगुन हा जगभरातील आपले नातेवाईक आणि मित्रपरिवाराशी जोडण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. यामुळे नक्कीच तुमचे संबंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
कंपनीचा मोटो
या कंपनीचा उद्देश जोडणे, शेअर करणे आणि कमावणे असा आहे.