नवी दिल्ली : मोबाइल डेटा आणि त्या संबंधित आकडे यांची माहिती देणारी कंपनी 'एनी'ने (ANNI) सोमवारी सर्वाधिक वापर होणाऱ्या ऍपची माहिती दिली. एनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 'व्हाट्सऍप' आणि 'फेसबुक' यांच्यानंतर शेअरिंग ऍप 'शेअरइट'ला सर्वाधिक डाउनलोड केले जात आहे. भारतात 'शेअरइट' वापरकर्त्यांची संख्या ४० कोटींपर्यंत आहे. प्रत्येक महिन्याला संपूर्ण जगभरातून 'शेअर इट' वापरकर्त्यांच्या संख्येत २० कोटीने वाढ होते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअरइट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करम मल्होत्रा यांनी सांगितले की, भारतीय बाजारात मागच्या वर्षी कंपनीने तीन मोठ्या शहरात संशोधन केले. यात दिल्ली , बंगळुरु, मुंबई या शहरांचा समावेश करण्यात आला होता. संशोधन करताना कंपनीला शेअरइटमध्ये वापरकर्त्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले.  


एकूण नऊ भाषांत शेअरइटची सेवा


शेअरइट, डिजिटल कंटेट सुरु करण्यासाठी कंटेट प्रोव्हाइडरसोबत भागीदारी करत आहे. यामधून शेअरइटवर शॉर्ट व्हिडिओ, सिनेमा आणि संगीत चालवण्यात येणार आहे. तसेच ९ भाषांच्या यात समावेश करण्यात येणार आहे. शेअरइट ऍपचे संपूर्ण जगात १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. या ऍपचे काम बीजिंग, शांघाय, नवी दिल्ली आणि बंगळुरु येथून चालते. शेअरइट भारतात मोफत डाउनलोड केले जाते.