Shincoचे ३ जबरदस्त टीव्ही भारतात लाँच
ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये उपलब्ध टीव्ही उपलब्ध आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढत असताना भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारात चिनी वस्तूंना असणारी मागणी कमी होताना दिसत आहे. दरम्यान आता मेक इन इंडिया अंतर्गत इंडियन स्मार्ट टेलिव्हिजन ब्रँड Shincoने तीन नवीन टीव्ही बाजारात दाखल केल्या आहेत. यामध्ये ४३ इंचाचा SO43AS, ४९ इंचाचा 4K SO50QBT आणि ५५ इंचाचा 4K SO55QBT या टीव्हीचा समावेश आहे.
ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ४३ इंचाचा SO43AS टीव्हीची किंमत १६ हजार ६९९ रुपये आहे. तर या टीव्हीची ओरिजनल किंमत १८ हजार १९९ रुपये आहे. महत्त्वाचं म्हणजे या टीव्हीला ग्राहकांनी देखील पसंती दर्शवली आहे. आज या सेलचा अखेरचा दिवस आहे.
ऍमेझॉन प्राईम डे सेलमध्ये ४९ इंचाचा 4K SO50QBT टीव्हीची किंमत २४ हजार २५० रुपये असून टीव्हीची ओरिजनल किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. तर ५५ इंचाचा 4K SO55QBT टीव्ही २८ हजार २९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या टीव्हीची नेहमीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय अनेक ऑफर्स देखील कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.
सेलमध्ये Shincoने ४के टीव्ही, स्मार्ट टीव्ही सोबत फुल HD, HD LED टेलिविजन्सवर देखील दमदार सूट दिली आहे. त्याचप्रमाणे नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.