तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट
देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Most stolen vehicles in india: देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. जर तुम्ही मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि हिरो स्प्लेंडर सारख्या बाईक वापरत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पांढऱ्या कारची चोरी सर्वाधिक होत असल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे. पांढऱ्या रंगाच्या कार वाहतुकीत सहज मिसळतात. याशिवाय पांढऱ्या कारला वेगळ्या रंगात रंगवणे देखील सोपे असते. कार चोरीचा सर्वाधिक घटना दिल्ली-एनसीआरमध्ये घडतात. एनसीआरमध्ये दर 12 मिनिटांनी एक वाहन चोरीला जाते.
सर्वाधिक चारचाकींची चोरी
मारुती सुझुकी वॅगन आर/ मारुती सुझुकी स्विफ्ट
ह्युंदाई क्रेटा
ह्युंदाई सँट्रो
होंडा सिटी
ह्युंदाई i10
सर्वाधिक दुचाकींची चोरी
हिरो स्प्लेंडर
होंडा अॅक्टिव्हा
बजाज पल्सर
Royal Enfield Classic 350
TVS अपाचे
Moto E22s स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
कार आणि बाइक चोरीचा धोका दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक आहे. दिल्लीच्या रोहिणी, भजनपुरा, दयालपूर आणि सुलतानपुरी या उत्तरेकडील भागात चोरीच्या सर्वाधिक घटना घडतात. नोएडातील सेक्टर 12, पश्चिमेकडील उत्तम नगर आणि गुरुग्राममधील दक्षिण शहराचाही समावेश आहे.