मुंबई : आजकाल मोबाईल स्फोटाच्या अनेक घटना कानावर येतात. अनेकदा चार्जिंग होत असताना मोबाईलचा स्फोट होतो तर काही वेळेस खिशातच मोबाईल फुटतो. मोबाईलचा स्फोट होण्यापूर्वी मोबाईलमध्ये काहीतरी बदल होत असतात. ते नेमके कोणते? मोबाईलमधील बदल नेमके काय सांगतात? जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल स्फोटाची ५ कारणे सांगितली जात आहेत.


१. फोन गरम होणे


जर तुमचा फोन वारंवार गरम होत असेल तर ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये द्या. गरम होणारा स्मार्टफोन फुटण्याची शक्यता अधिक असते.


२. बॅटरी फुगणे


जर तुमच्या मोबाईलची बॅटरी फुगली असेल आणि बॅक पॅनल बाहेर आले असेल तर सावध व्हा. अशा स्थितीत बॅटरी फुटण्याची शक्यता अधिक असते. 


३. फोन वारंवार पडणे


फोन वारंवार पडल्यानेही बॅटरी डॅमेज होऊ शकते आणि त्यामुळेही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फोनची नीट काळजी घ्या आणि तो वारंवार पडणार नाही याची खबरदारी घ्या. 


४. गरम जागी फोन चार्ज करणे टाळा


फोन नेहमी कमी तापमानातच चार्ज करा. कारण चार्जिंग होत असताना फोन थोडा गरम होतो. फ्रिजवर फोन ठेऊन कधीही चार्ज करु नका. रुम टेंम्परेजरचा फोन चार्ज करा. 


५. फोन पाण्यात पडण्यापासून सांभाळा


काही वेळेस फोन पाण्यात पडल्यास आपण स्वतःच तो दुरुस्त करायला जातो. पण असे करणे टाळा. कारण फोन पाण्यात पडल्याने फोनच्या अनेक समस्या उद्भवतात. बॅटरीत शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे अशावेळी फोन चार्ज करणे टाळा. अशावेळी स्फोट होण्याची संभावना वाढते. 


टिप्स:


  • हिटचा प्रभाव अधिक पडल्याने बॅटरी फाटण्याची संभावना वाढते.

  • चार्जिंग करत असताना ग्राफिकल गेम्स खेळू नका. त्यामुळे तापमान वाढलेल्या बॅटरीला नुकसान पोहचते.

  • त्याचबरोबर ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्याच्याच चार्जने चार्ज करा. फोन रात्रभर चार्जिंगला लावू नका.

  • गरजेपेक्षा अधिक चार्ज केल्याने बॅटरीचे लाईफ कमी होते.