स्मार्टफोनची (smartphone) बॅटरी फुटण्याच्या किंवा फोनला आग लागण्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा खिशात फोनचा स्फोट होऊन अनेक जण जखमी झाल्याचाही अनेक घटना घडल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा बहुतांश घटनांमध्ये दोष ग्राहकांचाच असतो. काही प्रकरणांमध्ये, स्मार्टफोन युनिटमध्ये दोष असतो तर काही अपघात ग्राहकांच्या चुकीमुळे होतात. आपल्याच काही सवयी अशा अपघातांना कारणीभूत ठरू शकतात.


चार्जिंग (charging mistakes) करताना फोन वापरणे ही अनेकांची सवय असते. ही सवयही तुम्हाला महागात पडू शकते. तसेच अनेक जण तासनतास फोन चार्जिंगसाठी ठेवून जातात. त्यामुळेही मोठा धोका उद्भवू शकतो.


अनेक लोकांचे फोन चार्जिंग करताना गरम होतात आणि असे होणे सामान्य आहे. कारण चार्जिंग दरम्यान फोनच्या बॅटरीमधून खूप उष्णता बाहेर पडते. मात्र अतिउष्णतेमुळे अनेक अपघात होतात. या अपघातांमध्ये फोनसह वापरकर्त्याचेही मोठे नुकसान होते.


फोन तासनतास चार्ज करणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल तर तुमच्यासोबतही अपघात होऊ शकतो.  तुम्ही फोन तासनतास चार्ज केल्यास भरपूर उष्णता बाहेर पडते. यामुळे तुमच्या हँडसेटचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो आणि काहीवेळा फोनचा स्फोट देखील होतो. फोन चार्जिंगवर ठेवताच, तो आपल्याला अंदाजे वेळ दाखवतो. त्याचवेळी  फोन चार्जिंगमधून काढून टाकला पाहिजे.


चार्जिंग करताना गेम खेळण्याची सवयही अनेकांना असते. त्यामुळे हे करणे टाळले पाहिजे. कारण गेम खेळणे आणि चार्जिंग या दोन्ही प्रक्रियेत फोनमधून खूप उष्णता बाहेर पडते. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्याने फोन जास्त गरम होतो आणि त्यामुळे त्याचा स्फोटदेखील होऊ शकतो.


काही जणांना मोबाईल फोन कोणत्याही अॅडॉप्टर किंवा चार्जरने चार्ज करण्याची सवय असते. यामुळे तुमच्या फोनचे नुकसानही होऊ शकते. कारण प्रत्येक फोन वेगवेगळ्या चार्जिंग क्षमतेसह येतो.


त्यामुळे कोणत्याही चार्जरने तुमचा फोन चार्ज करणे तुम्हाला महागात पडू शकते. अशावेळी अपघातही घडण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य चार्जचाच वापर करावा