`या` 6 चुकांमुळे Smartphone होतो खराब, एकदा वाचा आणि मग ठरवा
स्मार्टफोन आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. पण कधी कधी आपल्या चुकीच्या सवयींमुळे स्मार्टफोन आयुष्य कमी होतं.
Smartphone Mistake: सध्याच्या काळात स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोन शिवाय जगणं कठीण आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन आपल्या हाताशी असतो. स्मार्टफोनच्या (Smartphone) माध्यमातून मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांसोबत संपर्कात राहता येतं. स्मार्टफोनमध्ये असलेले फोटो, व्हिडीओ आणि मेसेज आपल्याला जुन्या आठवणी जाग्या करतात. एका अर्थाने स्मार्टफोन हा आपला मित्र झाला आहे, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे स्मार्टफोन आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. पण कधी कधी आपल्या चुकीच्या सवयींमुळे स्मार्टफोन आयुष्य कमी होतं. काही चुका स्मार्टफोनसाठी महागात पडतात. चला तर जाणून घेऊयात
Downloading Apps: स्मार्टफोन वापरताना चुकीच्या सोर्सवरून अॅप डाउनलोड करणं महागात पडू शकतं. यामुळे व्हायरल येऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन धीम गतीने चालतो किंवा खराब होतो. त्यामुळे कोणतंही अॅप डाउनलोड करताना काळजी घ्याल. गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करणं कधीही चांगलं ठरेल. पण एखादं अॅप गुगल प्लेवर नसेल तर इतर ठिकाणाहून डाउनलोड करण्याची चूक करू नका.
Android OS Update: मोबाइल ब्रँड नियमितपणे मोबाइल OS (Android) साठी सॉफ्टवेअर तसेच Security Update शेअर करत असतात. यामुळे डिव्हाइसमध्ये नवीन फीचर्स आणि डिझाइन डिजाईन एलिमेंट येतात. या अपडेटमुळे Malicious अॅप्स आणि इतर धोक्यांपासून संरक्षण मिळतं. तुमचा स्मार्टफोन व्यवस्थित ठेवण्यासाठी ही अपडेट्स डाउनलोड करणे महत्त्वाचे आहे.
Back Cover Protection: बॅक कव्हर तुमच्या डिव्हाइसची सुरक्षा करते. डिव्हाइससाठी नवीन कव्हर घेताना गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे मोबाईल खाली पडला तरी कार्यक्षमतेने संरक्षण करते. सिलिकॉन फोन केस इतर कव्हरपेक्षा अधिक टिकाऊ असतात.
Using Old Apps: विशिष्ट अॅप्ससाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या सूचना येतात, मात्र काही जण त्या प्रकर्षाने टाळतात. पण हे अपडेट डिव्हाइस सुरळीत आणि सुरक्षितपणे चालवण्यास मदत करतात. त्यामुळे अपडेट खूप महत्त्वाचे असतात. अपडेटकडे दुर्लक्ष केल्यास डिव्हाइसवर मालवेअर हल्ला होऊ शकतो.
WhatsApp यूजर्सना मोठा धक्का, 'या' Smartphone मध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद
Using Public Wi-Fi: सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क स्वस्त असतं आणि वापरण्यास सहज उपलब्ध असतं. मात्र यामुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस येऊ शकतो. नेटवर्कवरून पाठवलेली माहिती या नेटवर्कशी जोडलेले हॅकर्स सहज पाहू शकतात. त्यामुळे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरताना तुम्ही VPN वापरत असल्याची खात्री करा. असं असलं तरी मोबाइल डेटा उपलब्ध असल्यास सार्वजनिक Wi-Fi वापरणं टाळा.
Charger: स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी चुकीचा चार्जर वापरल्यास फटका बसतो. कधी कधी बनावट चार्जरमुळे आग किंवा शॉर्ट सर्किटची घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे स्मार्टफोन खराब होऊ शकतो. त्यामुळे कंपनीचा चार्जर विकत घ्या.