नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये सातत्याने नवनवे अपडेट्स येत असतात. रोज नवीन अॅप्स देखील लॉन्च होत असतात. आणि ते डाऊनलोड करण्याचा मोह स्मार्टफोन युजर्संना आवरता येत नाही. मात्र सॉफ्टेवेअर किंवा अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्या एक नवे अॅनरॉईड मालवेअर आले आहे ज्यामुळे २३२ बॅंकींग अॅप्स धोक्यात आहेत. वृत्तानुसार, यामार्फत मालवेअर युजर्स लॉगिंग संबंधित माहिती चोरी करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.


काय आहे हे मालवेअर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालवेअर हे एक सॉफ्टवेअर असून जे कंप्म्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये मधील युजर्सची माहिती चोरण्यासाठी बनवले जाते. यामार्फत हॅकर्स सॉफ्टवेअर डिव्हाईसमधून महत्त्वाची माहिती चोरी करतात. 
रिपोर्टनुसार, हे मालवेअर भारतीय बॅंकांच्या अॅप्सवर निशाणा साधत आहे. यात HDFC मोबाईल बॅंकींग, एक्सिस मोबाईल बॅंकींग,  SBI पर्सनल, ICICI बॅंक, IDBI बॅंक, बडोदा बॅंक आणि युनियन बॅंक या बॅंकांचे अॅप्स सामिल आहेत. क्विकहील सिक्युरिटी लॅबनुसार हे अॅनरॉईड मालवेअर Android.banker.A2f8a असे आहे. हे युजर्सची लॉगिंग माहिती चोरण्यासाठी बनवले आहे. हे मालवेअर मोबाईलचे एसएमएस हायजॅक करण्यापासून सर्व्हरवर फोनमधील कॉन्टक्टस् आणि एसएमएस अपलोड करू शकतात.


फोनमध्ये असे पाठवले जाईल मालवेअर


क्विकहील ब्लॉगनुसार,  Android.banker.A2f8a  या फेक प्लेअर अॅपच्या माध्यमातून हे पाठवण्यात येईल. यात थर्ड पार्टी अॅप स्टोर देखील पाठवले जाईल. अॅडोब फ्लॅशप्लेअर इंटरनेटवर अतिशय पॉप्युलर प्रॉडक्ट आहे. फ्लॅशप्लेअर जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे हॅकर्स याचा गैरवापर करतात.


असे काम करते हे मालवेअर


हे मालवेअर फ्लॅशच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल होते. त्याचे आयकॉन दिसत नाही. हे बॅकग्रॉऊंडला काम करते. आणि २३२ बॅंकींग अॅप्समधून कोणतेतरी एकच चेक केले जाते. टार्गेट अॅप मिळताच स्मार्टफोन युजर्सला नोटीफिकेशन मिळते. ते बॅंकींग अॅपसारखेच दिसते. त्यामुळे युजर्स सहज फसतात. नोटीफिकेशनला ओपन केल्यावर एक फेक लॉगिंग विंडो दिसते. आणि तेव्हापासूनच तुमची महत्त्वाची माहिती हॅकर्सला मिळते. मालवेअर तुमच्या स्मार्टफोनचे मेसेज देखील हॅक करतात. यामुळे तो OTP ही रिड करतो. त्यामुळे सावधगिरी बाळगून नोटीफिकेशन ऑन करा.