नांदेड  : भोकर येथे एक धक्कादायक घटना घडली. ‘रेड मी’मोबाईलमधून धूर आल्याने एकच धावपळ उडाली. काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. मात्र, वॉरंटीत मोबाईल असताना कंपनीने हात वर केल्याने संतप्त ग्राहकांने ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘रेड मी’कंपनीचा मोबाईल चालू करताच धूर निघाला. तात्काळ मोबाईल त्याच स्थितीत जळाल्याची घटना भोकर शहरात घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रहिवासी प्रा. मीरा जोशी यांनी रेड मी वाय १, मॉडेलचा बॅटरी इनबिल्ट असलेला मोबाईल खरेदी केला. मात्र, नव्या मोबाईल चालू करताच मोबाईलमधून धूर येण्यास सुरुवात झाली.


या प्रकाराबाबत मोबाईलची वॉरंटी असल्याने दुकानदाराशी संपर्क केला. नांदेड येथील कंपनीच्या केअर सेंटरकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार केअर सेंटरला भेट दिली असता सुरुवातीला कंपनीला कळवून मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे वेळोवेळी भेट घेतली असता मात्र बर्न केस आम्ही घेत नाहीत. तुम्ही कंपनीशी डायरेक्ट संपर्क करा, असे सांगत टाळण्यास केली. कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता मोबाईलमधील बॅटरी उघडण्याचा प्रयत्न केला गेल्याने हा प्रकार घडल्याचे कारण सांगून हात वर करण्यात आले.