Twitter Rules:  जर तुम्ही ट्विटर यूजर्स असाल आणि तुम्ही दररोज ट्विट करत असाल तर तुम्हाला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. खरंतर, तुम्हाला ट्विटरवर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण हे प्लॅटफॉर्म अनेक बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे आणि तुम्ही त्यावर निष्काळजीपणाने काम केल्यास तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जशी काळजी न घेतल्यास त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला ट्विटरवरही या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. असे न केल्यास तुरुंगात जावे लागू शकते तसेच तुमच्यावर मोठी कायदेशीर कारवाईही होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या गोष्टींबद्दल सांगणार आहोत जेणेकरुन तुम्ही ट्विटरचा वापर सुरक्षितपणे करु शकता. 


अपमानास्पद भाषा वापरणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही असे ट्विट केले ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली गेली असेल तर अशा ट्विटवर आयटी नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते आणि ज्या व्यक्तीने हे ट्विट केले आहे त्याला तुरुंगात जावे लागू शकते.


आक्षेपार्ह फोटो


जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे किंवा समुदायाचे आक्षेपार्ह चित्र ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते किंवा कोर्टातही जावे लागू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, ट्विटर स्वतःच असे ट्विट ब्लॉक करते, परंतु तसे न झाल्यास आणि एखाद्याला याबद्दल माहिती मिळाल्यास, तो या प्रकरणाची तक्रार देखील करु शकतो, ज्यावर कारवाई केली जाते.


विशिष्ट जातीविरुद्ध टीका


एखाद्या विशिष्ट जाती किंवा समुदायाविरुद्ध शेरेबाजी केल्यास किंवा जात-विशिष्ट शब्द वापरल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना तुरुंगात जावे लागू शकते. अशा परिस्थितीत ट्विटद्वारे कोणाच्याही विरोधात अशा शब्दांचा वापर करु नये.