वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसबाबत coronavirus दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टविरोधात फेसबुकने Facebook कारवाई केली आहे. दुसऱ्या तिमाहीत फेसबुकने कोरोना संबंधात 70 लाख खोट्या, गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट हटवल्या आहेत. यामध्ये व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अविश्वसनीय उपायांशी संबंधित पोस्टचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकने Community Standards Enforcement Report अंतर्गत, हे आकडे जारी केले आहेत. फेसबुकने याबाबत बोलताना सांगितलं की, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरण्यापासून, रोखण्याच्या दिशेने ते सातत्याने काम करत आहेत. 


सोशल मीडिया फेसबुकने, दुसर्‍या तिमाहीत द्वेष पसरवणारी 2.25 कोटी (22.5 मिलियन) भाषणं आपल्या फ्लॅगशिप अ‍ॅपवरुन हटवली आहेत. यादरम्यान फेसबुकने दहशतवादी संघटनांशी संबंधित जवळपास 87 लाख पोस्टही हटवल्या आहेत. तर गेल्या तीन महिन्यात 63 लाख पोस्ट हटवल्या आहेत. 


कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर सतत चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे. हीच बाब लक्षात घेता, फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यांनी, दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे.