मुंबई : जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर सावधान. कारण अ‍ॅपल iOs आणि  iPadOSमध्ये काही मूलभूत त्रुटी राहिल्यात. हॅकर्स या त्रुटींचा वापर करुन महत्त्वाची माहिती चोरु शकतात. CERTनं हा इशारा दिलाय. त्यामुळे वापरकर्त्यांनी सर्व सिक्युरिटी अपडेटच्या माध्यमातून आपला  फोन सुरक्षित करावा असं आवाहन करण्यात आलंय. (some basic errors in apple iOs and ipados)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अ‍ॅपलने नुकतेच नवीन आयपॅड मॉडेल्स लाँच केले आहेत. यामध्ये 10.9-इंच स्क्रीनसह iPad आणि iPad Pro मॉडेलचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने आपल्या अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ केली आहे. या यादीमध्ये iPad ते iPhone पर्यंतचा समावेश आहे. ब्रँडने अनेक अॅक्सेसरीजच्या किमतीही वाढवल्या आहेत.


जवळपास सर्व Apple Watch बँडसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. असाच काहीसा प्रकार एअर टॅगच्या बाबतीत घडला आहे. अगदी iPhone SE च्या किमतीतही वाढ झाली आहे.