मुंबई : ज्यांना रिलायन्स जिओचा फोन आधी ठरलेल्या तारखेत बुक करण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आता पुन्हा एकदा जिओचा फिचर फोन बुक करण्याची संधी मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीनंतर इच्छुकांना ही संधी मिळणार आहे.  जिओफोनची प्री बुकींग वेबसाइट किंवा जवळच्या जिओ स्टोअरमध्ये करता येणार आहे.


दुस-या टप्प्यात फोनची बुकींग केल्यानंतर हा फोन नोव्हेंबर महिन्यापर्यंत ग्राहकांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या फेजमध्ये कंपनीला मोठ्या प्रमाणात बुकींग मिळालं होतं. त्याचंच शिपिंग सध्या सुरु आहे. दरम्यान, प्री-बुकींगबाबत कंपनीनं कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.


२४ ऑगस्टला जिओफोनच्या पहिल्या फेजमधील बुकींग सुरु झालं होतं. ज्यामध्ये पहिल्या तीन दिवशीच लाखो लोकांनी प्री-बुकींग केलं होतं. जिओच्या फीचर फोनची किंमत ही शून्य रुपये आहे. पण या फोनसाठी १५०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. जी नंतर तुम्हाला परत केली जाणार आहे.