How To Block Spam Calls: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. बहुतांश लोकं ड्युअल सिमकार्ड असलेला स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे स्पॅम कॉलचा त्रास सर्वाधिक होतो. कधी लोनसाठी, तर कधी इंश्युरन्ससाठी कॉल येतात. वैतागून अनेक जण हे नंबर ब्लॉक करतात. असं केलं तरी दुसऱ्या नंबरवरून कॉल येण्यास सुरुवात होते. कॉल्स आणि एसएमएसमुळे अनेक जण फिशिंगचेही बळी ठरले आहेत. फसवणूक करणाऱ्यांना एसएमएसमध्ये अडकवण्यासाठी लॉटरी आणि मोफत ऑफरचे आमिष दाखवले जाते. काही लोक सापळ्यात अडकतात आणि बँक तपशील शेअर करतात. यामुळे त्यांचे बँक खाते काही मिनिटांतच रिकामे होते. असे घोटाळे ट्रेंड सिंडिकेट चालवतात. म्हणून, कोणाशीही नंबर शेअर करण्यापूर्वी, ही वेबसाइट बनावट आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा. पण अनेकदा प्रश्न पडतो की, या लोकांना आपला नंबर मिळतो कुठून? चला तर जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पॅम कॉल आणि मॅसेज त्रासदायक ठरतात. यामुळे आपला पर्सनल डेटा लीक होण्याची शक्यता असते. तुमचा मोबाईल नंबर डेटा सेटशी जोडलेला असतो. या डेटामध्ये तुमचे नाव, वय आणि सर्व आवश्यक माहिती असते. तुम्ही तुमचा नंबर किंवा वैयक्तिक माहिती एखाद्यासोबत शेअर करता तेव्हा ती पुढे शेअर केली जाते. समजा तुम्ही एखाद्या वेबसाइटवरुन काही घेण्यासाठी ऑर्डर केली तर तुमचा नंबर आणि नाव टाकता. तेव्हा डेटा सेव्ह होतो. तुम्ही कोणत्याही वेबसाइटवर तुमची माहिती टाकताच तुमचा मोबाईल नंबर लीक होतो आणि फोनवर कॉल्स येऊ लागतात. कर्ज आणि बँकिंग संबंधित सेवांबाबतही असेच घडते.


या अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्पॅम कॉल ब्लॉक करा


Truecaller: हे अ‍ॅप सर्वाधिक वापरले जाते. हे अ‍ॅप अनोळखी कॉल ओळखण्यात मदत करते.  फसवणूक कॉल आणि स्पॅम कॉल शोधते आणि आधीच सूचना देते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही कोणताही नंबर ब्लॅकलिस्ट आणि ब्लॉक करू शकता.


Should I Answer?: हे अ‍ॅप देखील एक उत्तम पर्याय आहे. या अ‍ॅपमध्ये स्पॅम नंबर्सचा मोठा डेटाबेस आहे, जो सतत अपडेट केला जातो. जर कोणी कॉल करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना आपोआप ब्लॉक करेल. या अ‍ॅपद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल्सही ब्लॉक केले जाऊ शकतात.


Calls Blacklist: हे देखील एक उत्तम अ‍ॅप आहे. अ‍ॅप कॉल आणि एसएमएस संदेश दोन्हीसाठी कॉल ब्लॉकर आहे.


Call Blocker:  या अ‍ॅपद्वारे कॉल सेंटर, स्पॅम नंबर, रोबोकॉल, टेलीमार्केटिंग इत्यादींवरील अनोळखी कॉल ब्लॉक करण्याचे उत्तम काम करते.