स्मार्टफोन्समधील खास सेटिंग्स
काही ठराविक गोष्टी सोडल्या तर स्मार्टफोन्समधील इतर सेटिंग्स अनेकांना माहित नसतात. जाणून घेऊया अशाच काही सेटींग्सबद्दल.
नवी दिल्ली : देशात स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांची संख्या जलद गतीने वाढत आहे. परंतु, काही ठराविक गोष्टी सोडल्या तर स्मार्टफोन्समधील इतर सेटिंग्स अनेकांना माहित नसतात. जाणून घेऊया अशाच काही सेटींग्सबद्दल.
Gboard सेटिंग :
ही सेटिंग करण्यासाठी सर्वप्रथम फोनमध्ये सेटिंग मध्ये जा. त्यानंतर Language and input हा ऑप्शन सिलेक्ट करा. मग Gboard वर टॅप करून advanced वर क्लिक करा. त्यानंतर Share usage statistics आणि share snippets हे ऑप्शन्स ऑन करा. त्यामुळे तुमच्या फोनचा Gboard पूर्वीपेक्षा चांगला होईल.
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंग :
फोन सेटिंग्स मध्ये जावून गुगलवर टॅप करा. शेवटी Smart lock for password हा पर्याय दिसेल. या सेटिंगवरून अॅप आणि वेबसाईटवर ऑटो लॉगइन करा. ज्याचा पासवर्ड सेव्ह करायचा नसेल तो तिथे तुम्ही अॅप्स अॅड करू शकता. त्यामुळे तुमचा मोबाईल डेटा ऑनलाईन लीक होणार नाही.
गुगल अॅक्टिव्हिटी डिलीट करण्यासाठी :
ब्राउजरवर जाऊन myactivity.com टाईप करा. त्यापुढील ऑप्शनवर टाईप करा. डाव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करून मेन्यूवर जा. तिथे delete activity by वर क्लिक करून delete पर्याय निवडा. यामुळे गुगलवरील अॅक्टिव्हिटी डिलीट होईल.