नवी दिल्ली : स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.


प्रत्येक दिवशी वेगवेगळी ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पाईसजेट कंपनीने 'रेड हॉट' ऑफर लॉन्च केली असून ही ऑफर संपूर्ण एक आठवडा सुरु राहणार आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळी डील असणार आहे. कंपनीने प्रत्येक दिवशी वेगवेगळी ऑफर सादर केली आहे.


सोमवारी 'मेरी मंडे' (Merry Monday)


स्पाईसजेट कंपनीने सोमवारच्या ऑफरला 'मेरी मंडे' नाव दिलं आहे. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर १००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. म्हणजेच सोमवारी एचडीएफसी क्रेडिट कार्डवरुन तिकीट बुक केल्यास १००० रुपयांची सूट मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सोमवारच्या दिवशीच बुकिंग करावी लागणार आहे आणि प्रोमो कोडच्या जागी HDFC१००० इन्सर्ट करावं लागणार आहे.


'टेरिफिक ट्यूसडे'(Terrific Tuesday)


मंगळवारी इंड्सइंड बँकेच्या ग्राहांसाठी ही ऑफर आहे. इंड्सइंड बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरुन या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. यामध्ये फ्लाईट बुकिंगवर १००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्यासाठी पेमेंट करताना FLYINDUS कोड वापरावा लागणार आहे.


वॉव वेडनसडे (WOW WEDNESDAY)


बुधवारी स्पाईसजेटकडून २०% सूट देण्यात येत आहे. ही सूट विमानातील सिट सिलेक्शन आणि प्रायरिटी चेक इनवर लागू आहे. त्यासाठी पेमेंट करताना प्रोमो कोडमध्ये WDAY२० इन्सर्ट करावं लागणार आहे. 


थ्रिलिंग थर्सडे (THRILLING THURSDAY)


गुरुवारी स्पाईसजेटसोबत फ्री मिलची ऑफर आहे. ही ऑफर केवळ एसबीआय क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे. यामध्ये फ्री मिलसोबत SBIMEAL कोडचा वापर करावा लागणार आहे. 


फँटास्टिक फ्राइडे (FANTASTIC FRIDAY)


शुक्रवारी येस बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डधारकांना १००० रुपयांची सूट मिळणार आहे. ही सूट तिकीट बुकिंगवर मिळेल. या ऑफरमध्ये सिट सिलेक्शन पूर्णपणे फ्री असणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रोमो कोड YES१००० चा वापर करावा.


मॅक्स वीकएंड (MAX WEEKEND)


एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी स्पाईसमॅक्सवर ५०% सूट मिळणार आहे. त्यासाठी HDFCMAX प्रोमो कोडचा वापर करावा लागणार आहे. या ऑफरचा लाभ शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारीही मिळणार आहे.