मुंबई : आयफोन Xची क्रेज काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. भारतामध्ये तर या फोनच्या प्री-बूकिंगलाही सुरुवात झाली आहे. भारतामध्ये सध्या या फोनची किंमत ८९,००० रुपये एवढी आहे. एवढ्या महाग आयफोनबाबत मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे ऍपल्लनं केलेल्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन X ची ग्लास ही सर्वोत्तम असल्याचा दावा ऍपल्लनं केला होता. पण गॅजेट वॉरंटी कंपनी स्क्वेअरट्रेडनं आयफोन Xची ड्रॉप टेस्ट घेतली. या टेस्टमध्ये कंपनीनं आयफोन X ला सगळ्यात डेलिकेट आणि 'मोस्ट ब्रेकेबल आयफोन एव्हर'चा दर्जा दिला आहे.


स्क्रॅच टेस्टमध्ये पास, ड्रॉप टेस्टमध्ये फेल


फक्त स्क्वेअरट्रेडच नाही तर टेक वेबसाईट सी-नेटनंही आयफोन X ची ड्रॉप टेस्ट घेतली. ३ फुटांवरून पडल्यावरही आयफोन Xच्या टोकावर क्रॅक गेल्याचं या टेस्टमध्ये समोर आलं आहे. स्क्रॅचटेस्टमध्ये मात्र आयफोन पास झाला आहे. दुसऱ्यांदा हा फोन स्क्रीनच्या बाजूनं पाडण्यात आला. तेव्हा स्क्रीनला मोठा क्रॅक पडला.


फ्रिज टेस्टमध्येही आयफोन X फेल


ड्रॉप टेस्टच नाही तर फ्रिज टेस्टमध्येही आयफोन X फेल झाला आहे. आयफोन Xची फ्रिज टेस्ट ज्या ब्लॉगरनं घेतली त्यानंच आयफोन ७मध्ये हेडफोन जॅक ड्रिल केलं होतं. आयफोन X मध्ये फ्रिज टेस्टनंतर काही अडचणी आल्या आहेत.


सगळ्यात महाग दुरुस्ती खर्च


आयफोन X दुरुस्त करण्याचा खर्चही जास्त असणार आहे. या फोनला भारतामध्ये काही झालं तर दुरुस्तीचा खर्च इतर देशांपेक्षा जास्त असणार आहे. आयफोन Xची स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी ४१,६०० रुपयांचा खर्च येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आयफोन X हा फोन विकत घेताना दहा वेळा विचार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.