या सोप्या ट्रिकने आता `जिओ` फोनमध्येही चालणार व्हॉट्सअॅप
रिलायन्स जिओने `जियो फोन लॉन्च` केल्यानंतर युजर्सनी तो विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आणि बेसिक अॅप्लिकेशनसोबत हा फोन लॉन्च करण्यात आला होता.
मुंबई : रिलायन्स जिओने 'जियो फोन लॉन्च' केल्यानंतर युजर्सनी तो विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आणि बेसिक अॅप्लिकेशनसोबत हा फोन लॉन्च करण्यात आला होता.
वॉट्सअॅप काम करत नाही
आजकाल आबालवृद्ध एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. रिलायन्स जिओच्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप चालत नाही ही अनेकांची तक्रार होती. मात्र आता तुमची ही तक्रार दूर होणार आहे. काही ट्रिक्सचा वापर करून तुम्ही रिलायन्स जिओ मोबाईल फोनमध्येही व्हॉट्स अॅप वापरु शकता.
पहा हे स्टेप बाय स्टेप गाईड
पहिली स्टेप - फोन ब्राऊजरमध्ये www.browserling.com वेबसाईट ओपन करा. क्रोम ब्राऊजर सिलेक्ट करा.
दुसरी स्टेप - आता वेबसाईट्च्या अॅड्रेस बारमध्ये web.whatsapp.com ओपन करा.
तिसरी स्टेप - आता QR कोड दिसेल. आता ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू आहे त्यातून जिओमध्ये दिसत असलेला QR कोड स्कॅन करा. यानंतर जिओ फोनमध्येही व्हॉट्सअॅप सुरू होईल.
चौथी स्टेप - तुम्ही लॉगआऊट करत नाहीत तो पर्यंत फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू राहील.
युट्युबवर ट्रिक होतेय व्हायरल
युट्युबवर टेक्नॉलॉजीशी निगडीत अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. रिलायन्सच्या जिओमध्ये व्हॉट्सअॅप चालवण्यासाठी ही ट्रिक झपाट्याने शेअर होत आहे. 21 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.