हा 26 वर्षीय भारतीय 400 कोटींचा मालक! फक्त कंप्युटर, इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर मिळवलं यश
26 Year Old Indian Entrepreneur Earn Rs 400 Crores: केवळ इंटरनेट आणि कंप्युटरच्या मदतीने सुरु झालेल्या या प्रवासामध्ये त्याने विंडोजच्या अॅप्लिकेशनमध्ये अनेक प्रयोग स्वत:च केले. त्यामधूनच त्याने असं काही निर्माण केलं की आज तो काही शे कोटींचा मालक आहे.
26 Year Old Indian Entrepreneur Earn Rs 400 Crores: किशन बगरिया या 26 वर्षीय तरुण काही शे कोटींचा मालक आहे असं सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. आसाममधील दिब्रूगड येथून सुरु झालेला किशनचा प्रवास सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा तरुण उद्योजकापर्यंत पोहचला आहे. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल उत्सुकता असल्याने संशोधन करणारा तरुण म्हणून किशनने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील धडपड सुरु केली. केवळ इंटरनेट आणि कंप्युटरच्या मदतीने सुरु झालेल्या या प्रवासामध्ये त्याने विंडोजच्या अॅप्लिकेशनमध्ये अनेक प्रयोग स्वत:च केले. याच प्रयोगांमधून त्याने यश मिळवलं आहे. किशनची यशोगाथा ही ध्येयवादाच्या जोरावर डिजीटल साक्षरतेचा योग्य वापर करुन यश मिळवता येतं याचा पुरावा आहे.
नेमकं काय आहे या अॅपमध्ये?
किशनने त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांदरम्यान त्याने टेक्स्ट्स डॉट कॉमची निर्मिती केली. टेक्स्ट्स डॉट कॉम या मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील मेसेज एकाच जागी दिसतात. व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या वेगवेगळ्या माध्यमांवरील मेसेज एकाच ठिकाणी पाहता येण्याची सोय या अॅप्लिकेशनच्या एकाच इंटरफेसवर उपलब्ध आहे. या अॅपमध्ये एण्ड टू एण्ड इन्स्क्रीप्शन, प्रायव्हसी आणि सुटसुटीतपणा यासारखी वैशिष्ट्यं असल्याने ते वापरण्यास सुरक्षित आहे.
रातोरात झाला 400 कोटींचा मालक
किशनने निर्माण केलेलं हे अॅप अमेरिकेतील ऑटोमॅटिक नावाच्या कंपनीला एवढं पसंत पडलं की त्यांनी टेक्स्ट्स डॉट कॉमसाठी तब्बल 50 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 400 कोटी रुपये मोजले. जगप्रसिद्ध वर्ल्डप्रेस डॉट कॉम हे सुद्धा ऑटोमॅटिक कंपनीच्या मालकीचं आहे. या कंपनीनेच किशनच्या या नव्या प्लॅटफॉर्ममधील क्षमता ओळखून ते 400 कोटींना विकत घेतलं आहे. एवढ्या मोठ्या किंमतीला हे अॅप विकत घेण्याची तयारी कंपनीने दाखवली यावरुनच त्याचा साधेपणा, वैशिष्ट्य आणि उपयोग किती आहे हे अधोरेखित होतं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील मेसेजेस एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणाऱ्या या प्लॅटफॉर्मला भविष्यात सुगीचे दिवस येणार आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
सध्या त्याच्याकडे कोणती जबाबदारी?
ऑटोमॅटिकच्या नेतृत्वाखाली आता किशन टेक्स्ट्स डॉट कॉमच्या टीमचा प्रमुख झाला आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचं अधिक इंटिग्रेशन करुन युझर इंटरफेस अधिक सुटसुटीत कसा करता येईल यावर सध्या तो काम करत असून जागतिक स्तरावर हा प्लॅटफॉर्म गेमचेंजर ठरु शकतो. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणारी माहितीची देवाणघेवाण सर्वांना सहज सोपी होईल अशी आणि सुरक्षित असावी असा किशनचा प्रयत्न आहे. भविष्यात किशन त्याने निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्म अधिक फिचर्स आणू इच्छितो ज्या माध्यमातून आधुनिक मेसेजिंगच्या क्षेत्रात नवीन बदल पहायला मिळतील.