सुखद यात्रा अॅपद्वारे हायवेवरील प्रवास होणार सुकर!
आपल्याकडे खराब रस्ते, टोलवसूली, ट्रफीक हे प्रश्न तसे नेहमीचेच.
नवी दिल्ली : आपल्याकडे खराब रस्ते, टोलवसूली, ट्रफीक हे प्रश्न तसे नेहमीचेच. त्यामुळे प्रवासात अनेक अडचणी येतात. अनेकदा दुर्घटनाही घडतात. पण प्रवासात येणाऱ्या अडचणींची कल्पना तुम्हाला आधीपासूनच असेल तर? किती बरे होईल ना? मग असाच एक दिलासा देणारा अॅप लवकरच लॉन्च होणार आहे. हा सुखद यात्रा अॅप अशाच तुमच्या अनेक अडचणी सोप्या करेल.
आज होणार शुभारंभ
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी हे अॅप लॉन्च होणार आहे. त्याचबरोबर १०३३ हा हायवे इमरजेन्सी नंबरही सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर आणि रस्ते सुरक्षेत काम करणाऱ्या गैर सरकारी संघटनांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल.
सुखद यात्रा अॅप
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा तयार केलेल्या सुखद यात्रा अॅपच्या मदतीने राजमार्गावर वाहन चालवणारी कोणतीही व्यक्ती रस्त्याची स्थिती, टोल प्लाजाचे अंतर, स्थान, सुविधा, टोल सुविधा, टोल दर, तेथे वाट पाहण्यासाठी लागणारा वेळेचा अवधी याबद्दलची माहिती मिळवू शकतो. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे, दुर्घटना इत्यादींबद्दल तक्रार दाखल करु शकतो.
टोल फ्री नंबर
टोल फ्री नंबर १०३३ वर कॉल करून तुम्ही हायवेवर झालेल्या अपघाताची सूचना आपत्कालीन सेवांना देऊ शकता. या सेवेअंतर्गत प्रवाशांना अम्बुलन्स. वाहन उचलणारी टो-अवे क्रेन त्याचबरोबर लोकेशन ट्रेकींग फीचरची सुविधा प्राप्त होईल. यात वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये काम करण्यात येईल.
आर्थिक साहाय्य
रस्ते सुरक्षिततेसंबंधित प्रचार-प्रसार करण्यासाठी त्याचबरोबर जागरुकता कार्यक्रम चालवण्यासाठी सरकारी संघटनांना पाच लाखांचे आर्थिक साहाय्य केले जाईल. प्रत्येक राज्यात रस्ते सुरक्षिततेत काम करणाऱ्यांना पाच लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे तीन पुरस्कार देण्यात येतील.केंद्र सरकार प्रत्येक राज्यात कमीत कमी एक मॉडल मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर चालू करेल. या सेंटर्संना ५० लाख ते १ कोटींपर्यंचे अर्थ साहाय्य मिळेल.