नवी दिल्ली : सुजुकी मोटर इंडियाने भारतीय बाजारात आपली नवी १५० सीसी क्रुजर बाईक लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कंपनी ही बाईक ७ नोव्हेंबर रोजी लॉन्च करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जापानी कंपनी सुजुकीच्या क्रुजर बाईकला आव्हान असेल ते बाजारात असलेल्या बजाज अॅव्हेंजर १५० या बाईकचं. बजाज अॅव्हेंजर १५० एकमात्र १५०सीसी क्रुझर आहे जी भारतीय बाजारात विकली जात आहे. भारतात सरासरी ९ हजार बाईक प्रत्येक महिन्याला विकल्या जातात.


भारतीय बाजारपेठेत सुजुकी नवी क्रुजर Suzuki GZ150 या नावाने लॉन्च करु शकते. या बाईकमध्ये लांब हँडलबार्स, रिलॅक्स्ड सीटिंग पोझिशन फिचर्स असणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुजुकी GZ सीरिजची क्रुजर बाईक्स १२५सीसी आणि २५० सीसी इंजिनसोबत उपलब्ध आहेत.


सुजुकी भारतीय बाजारात आपली पहिली १५०सीसी क्रुजर बाईकला रेट्रो लुकमध्ये लॉन्च करणार आहे. त्यानंतर मॉडर्न लुकमध्ये लॉन्च करण्यात येईल.


सुजुकीच्या नव्या क्रुजरमध्ये जिक्सरचं १५५सीसी बाईकचं इंजिन असणार आहे. हे इंजिन ५ स्पीड ट्रांसमिशनसोबत असणार आहे. मात्र, सुजुकीने आपल्या या नव्या बाईकशी संबंधित फिचर्सबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये.


सुजुकीच्या GZ 150 सीरिजच्या बाईक संदर्भात बोलायचं झालं तर, कंपनी ही बाईक जिक्सर आणि एसएफ बाईक्सपेक्षा कमी किमतीत लॉन्च करु शकते. या बाईकची अंदाजे किंमत ७५,००० रुपयांपासून ८०,००० रुपयांच्या दरम्यान असल्याचं बोललं जात आहे. या बाईकमध्ये ११.५ लीटर पेट्रोलची क्षमता असणार आहे.