नवी दिल्ली : बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सुजुकी कंपनीने आपली एक नवी आणि दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुजुकी मोटर सायकलने भारतीय बाजारात टू-व्हीलरमध्ये आपली नवी क्रूजर बाईक Intruder चं FI (फ्यूल-इंजेक्शन) व्हेरिएंट लॉन्च केली आहे.


बाईकची किंमत...


कंपनीने Intruder Fi या बाईकची दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत 1.06 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर, या कारचं कार्ब्यूरेटेड व्हर्जनचं दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत 99,995 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक दोन कलर्समध्ये उपलब्ध आहे.


नागरिकांचा चांगला प्रतिसाद


सुजुकीची Intruder ही एक अशी बाईक आहे ज्यामध्ये फ्यूअल इंजेक्शन देण्यात आलं आहे. सुजुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या एक्झिक्युटीव्ह वॉईस प्रेसिडेंट (सेल्स अँड मार्केटिंक) संजीव राजशेखरन यांनी सांगितले, Suzuki Intruder लॉन्च झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या बाईकच्या 15,000 युनिट्स विकल्या आहेत. आमचं सेल्स टार्गेट 25 टक्के आहे. Suzuki Intruder मध्ये ABS आणि फ्यूल इंजेक्शन लावण्यात आल्याने आपल्या सेकमेंटमधील ही एक प्रीमिअम बाईक ठरली आहे.


असं आहे इंजिन आणि फिचर्स


Suzuki Intruder मध्ये 154.9 ccचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 14.8Ps ची पावर आणि 14Nm चं टार्क जनरेट करतं. या इंजिनमध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. तसेच मोठी फ्यूअल टँक, प्रोजेक्टर हेडलॅम्पस, आरामदायक रायडिंग पोझिशन आणि पाठीमागे एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत. यामध्ये 7 इंचाचे ब्लॅक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. बाईकला फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.