मुंबई: सुझुकी स्विफ्टचे हॉट व्हर्जन ऑस्ट्रेलियात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. या व्हर्जनला स्विफ्टचे रेड डिव्हिल एडिशन मॉडेल म्हणून ओळखले जात आहे. हे मॉडेल म्हणजे पॉप्युलर हॅचबॅकचे पॉवरफूल आणि अधिक वेगवान व्हर्जन आहे. कारची खासीयत अशी की, ही कार ० ते १०० किलोमिटर प्रतितास इतके स्पीड केवळ ८.१ सेंकांदात धारण करते. रेड डिव्हिलमध्ये रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत कॉस्मेटिक अपग्रेड असणार आहे. यात नवा रंग, बॉडी किटसह अधिक गोष्टींचा समावेश आहे.


१४ लाखांवर किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाल आणि काळ्या रंगाचे अनोखे कॉम्बीनेशन असलेल्या कारवर १०० यूनिट्स ऑफर केली जाईल. ऑस्ट्रेलियात या गाडीची किंमत २९,१५६ AUD म्हणजेच भारतील रूपयांत १४.८ लाख इतकी असेल. Swift Red Devil ही कार मॅकेनिकली स्विफ्ट स्पोर्ट कारसारखी असेल.  या गाडीत १.४ बूस्टरजेट टर्बो, ४ सिलिंडर इंजिन (१३८ हॉर्सपॉवर शक्तिचे आणि १३० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे) असणार आहे. इंजिनला स्पीड मॅन्यूअल ऑटोमॅटीक ट्रांन्समिशन सिस्टमयुक्त करण्यात आले आहे. 


कसे आहेत फिचर्स


फारसे बदल नसलेली ही नई स्विफ्ट रेड डेव्हिसल एडिशन स्विफ्ट स्पोर्टच्या तुलनेत अधिक आकर्षक दिसते. लाल आणि काळ्या रंगाच्या रेसिंग स्ट्राईपला ब्लॅक बंपर ब्लेडने कंबाईन केले आहे. जे कारच्या ओव्हरऑल लूकला नवी स्टाईल देते. दरम्यान, कारच्या अंतर्गत रचनेबाबत माहिती मिळू शकली नाही. पण, सांगण्यात येत आहे की, कारचा बराचसा भाग स्पोर्ट कारसारखा असणार आहे. कारमध्ये इंटेरियर डार्क आहे. जे हायलाईट्स आणि स्टायलिंग एलिमेंटयुक्त आहे. तर, सीटवर लाल रंग पहायला मिळेल. 


सुझुकीने यंदाच्या मार्चमद्ये स्विफ्ट स्पोर्ट मॉडेल इटलीमध्ये लॉन्च केले होते. यात पिवळ्या आणि काळ्या रंगाचे कॉम्बीनेशन पहायला मिळाले. त्या मॉडेलची किंमत १४.४० इतकी होती.