CNG सिलेंडरमुळे डिक्कीत जागा नसण्याची चिंता मिटली, Tata ने बाजारात आणली जबरदस्त Altroz CNG, 21 हजारांत बुकिंग
Tata Altroz CNG ला कंपनी एकूण चार व्हेरियंट्स आणि चार रंगाच्या पर्यायात सादर करत आहे. CNG कार असतानाही कंपनी बूट स्पेससंदर्भात कोणतीही तडजोड करताना दिसत नाही.
Tata Altroz CNG: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने अधिकृतपणे आपल्या Altroz iCNG ची बुकिंग सुरु केली आहे. लवकरत ही कार अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली जाणार आहे. यानंतर या कारच्या किंमतीचाही खुलासा होईल. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मे 2023 मध्ये Tata Altroz CNG ची डिलिव्हरी करण्यास सुरुवात होईल. कार खरेदी करण्यास इच्छुक असणारे ग्राहक अधिकृत डिलरशिप आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 21 हजार रुपयांत बूक करु शकतात.
Tata Altroz iCNG एकूण चार व्हेरियंटमध्ये लाँच केली जाणार आहे. यामध्ये XE, XM+, XZ, आणि XZ+ आहेत. तसंच ग्राहकांनी एकूण चार रंगांचा पर्याय असेल. ज्यामध्ये ओपेरा ब्ल्यू, डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे आणि एव्हेन्यू व्हाइट यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, Altroz CNG वर कंपनी तीन वर्ष किंवा 1 लाख किमीची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे.
Altroz CNG सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सीएनजी कार असतानाही तुम्हाला बूट-स्पेस म्हणजेच डिक्कीतील जागेसाठी कोणतीही तोडजोड करण्याची गरज नाही. यामध्ये सीएनजी सिलेंडर बूटच्या खालील भागात ठेवण्यासाठी जागा करण्यात आली आहे. तसंच वरती एक मजबूत ट्रे देण्यात आली आहे, जी दोन्ही विभागांमध्ये अंतर ठेवते. ही देशातील पहिली सीएनजी कार आहे, जी दोन सिलेंडर टेक्नॉलॉजीसह येत आहे असा कंपनीचा दावा आहे.
या कारमध्ये 1.2L रेवॉट्रॉन बाय-फ्यूएल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन पेट्रोल मोडवर 85bhp पॉवर आणि 113Nm चा टार्क जनरेट करतं. पण सीएनजी मोडवर याची पॉवर आऊटपूट कमी होऊन 77bhp इतकी होते. या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकमध्ये सिंगल एडव्हान्स ईयुसी आणि डायरेक्ट स्टेट सीएनजीसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय कारमध्ये 7.0 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम देण्यात येणार आहे, जे अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कार प्लेला सपोर्ट करतं. कारमध्ये अॅक्टिव्हेटेट सनरुफ, 16 इंचाचा अलॉय व्हील, स्टार्ट-स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, उंचीप्रमाणे ड्रायव्हिंग सीट करण्याचा पर्याय तसंच मागील सीटवर एसी वेंट्ससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
दरम्यान कारच्या डिझाईनबद्दल बोलायचं गेल्यास, कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये जे मॉडेल सादर केलं होतं ते पाहता हे रेग्युलर हॅचबॅकप्रमाणेच आहे. याच्या इंटिरिअरमध्ये iCNG शिवाय इतर कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. घरगुती बाजारात टाटा मोटर्सने आणलेली ही तिसरी सीएनजी कार आहे. याआधी कंपनीने टिएगो आणि टिगोर सेदान यांचं सीएनजी व्हेरियंट लाँच केलं आहे.