iPhone वर उमटणार `टाटा`ची मोहोर; भारतात तयार करणार आयफोन, केंद्रीय मंत्र्यांची माहिती
Tata iPhone: जगभरात अॅपल (Apple) कंपनीच्या आयफोनची क्रेझ वाढत आहे. आयफोन (iPhone) किंवा अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट बाजारात लाँच होताच त्याची मागणीही वाढते. आयफोन घेणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
TATA First iPhone Manufacture in India: अॅपलच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता अॅपलवर टाटाचा शिक्का उमटणार आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अॅपलचे आयफोन भारतात बनवण्यास सुरुवात करेल, असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या वाढीला हे दल पूर्णपणे समर्थन देत आहे. हे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सना समर्थन देईल जे भारताला त्यांचे विश्वसनीय उत्पादन आणि प्रतिभा भागीदार बनवू इच्छितात. भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स शक्ती बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे ध्येय साकार करायचे आहे.
ग्लोबल इंडियन इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या विकासासाठी संपूर्ण पाठिंबा देत आहोत. भारताकडून जागतिक इलेक्ट्रॉनिक ब्रँड्सचे समर्थनदेखील करण्यात येत आहे. भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारात शक्तीशाली बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय साकार करायचे आहे, असं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
विस्ट्रॉन फॅकट्री कर्नाटकच्या साउथईस्टमध्ये आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2024 पर्यंत विस्ट्रॉनच्या फॅक्टरीमध्ये जवळपास 1.8 बिलियन डॉलरच्या Apple iPhone बनवणार आहे. टाटा या फॅक्टरीमध्ये ग्लोबल मार्केटसाठी iPhone 15ची मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येणार आहे. विस्ट्रोन फॅक्टरीचे एकूण मुल्य हे 600 मिलियन डॉलर इतके आहे. गेल्या एक वर्षांपासून याबाबत बोलणं सुरू होतं. या फॅक्टरीमध्ये आयफोन 14 मॉडलचे मॅन्युफॅक्चरिंगसाठी केले होते. या फॅक्टरीत जवळपास 10,000 हून जास्त कर्मचारी काम करतात.
रिपोर्टनुसार, विस्ट्रॉन फॅक्टरीत तोट्यात जात होती. अॅपलच्या अटींनुसार कंपनीला तोटा सहन करावा लागत होता. विस्ट्रॉनच्या म्हणण्यानुसार, Appleला फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनपेक्षा जास्त मार्जिन दिलं जाते. त्याचवेळी चीनच्या तुलनेत भारतात वेगवेगळी आव्हाने आहेत. त्यामुळे भारतात काम करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत विस्ट्रॉन आपली कंपनी विकणार असल्याचे समोर आले होते. लवकरच टाटाचा अॅपलसोबतचा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.
टाटा हा भारतातील विश्वासनीय ब्रँड आहे. मीठापासून ते तंत्रज्ञानापर्यंत टाटा वस्तू तयार करते. गेल्या 155 वर्षांपासून टाटा भारतातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं भारतात जर आयफोनचे उत्पादन होणार असेल तर भारतीयांसाठी ही मोठी गोष्ट असेल.