मुंबई : टाटा मोटर्सने नवीन एसयूवी टाटा हॅरियरवरून सर्व पडदे उचलले आहेत. जानेवारी 2019 मध्ये लाँच होणारी एसयूवी चार वेरिएंट्समध्ये दिसणार आहे. एसयूवीचे डायमेंशन, इंजिन आणि ट्रान्समिशनसोबत कंपनीने यावेळी कोण कोणत्या वेरिएंटसोबत कोणकोणते फिचर्स दिले आहेत याची देखील माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


Tata Harrier XE 


एक्सई टाटा हॅरिअरच बेस वेरिएंट आहे. यामध्ये ड्यूल एअरबॅग्स, ईबीडीसोबत एबीएस, पार्किंग सेंसर, स्पीड सेंसिटिव डोअर लॉक्स, सीट बेल्ट रीमायंडर, सेंट्रल लॉकिंग, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लॅम्प्स, 16 इंच स्टील वील्ज, पावर अॅडजेस्टेबल विंग मिरर्स आणि 4 इंचाचे मल्टी इन्फर्मेशन डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच वेरिएंटमध्ये मॅन्युअल एसी, चारही बाजूंना अॅडजेस्टेबल ड्रायवर सीट, पडल लॅम्प्स टिल्ट आणि टेलेस्कोपिक यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 



Tata Harrier XM 


या वेरियंटमध्ये फ्रंट फॉग लॅम्प्स, रियर पार्सल सेल्फ, चार स्पीकर्स आणि दो ट्विटर्ससोबत  7-इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल्स, USB, Aux आणि ब्लूटूथ ऑडियो सिस्टम देण्यात आलं आहे. यासोबतच मल्टी ड्राइव मोड्स, रिमोट सेंट्रल लॉकिंग, अजस्टेबल ड्राइवर सीट, फॉलो-मी-होम हेडलैम्प्स, रियर वाइपर आणि बूट लॅम्प देखील वेरियंटमध्ये देण्यात आलं आहे. 



Tata Harrier XT


हॅरियरच्या वेरियंटमध्ये ड्यूल फंक्शन एलईडी डीआरएल, 17-इंच अलॉय वील्ज, चार स्पीकर्स आणि चार ट्विटर्ससोबत ऑडियो सिस्टम, यूएसबीच्या माध्यमातून विडियो प्ले बॅक आणि इमेज डिस्प्ले, वॉयस रिकग्निशन आणि एसएमएस रीडआउट, ऐंड्रॉयड ऑटो, रियर डीफॉगर, रिवर्स कैमरा, पुश बटन स्टार्ट आणि क्लाइमेट कंट्रोल फीचर्स मिळणार आहेत. 


यासोबतच या वेरियंटमध्ये अजस्टेबल ड्राइवर सीट, पावर फोल्डिंग आणि अजस्टेबल विंग मिरर्स, ऑटोमैटिक हेडलैम्प्स आणि वाइपर, क्रूज कंट्रोल, फ्रंट सेंटर आर्मरेस्टमध्ये कूल्ड स्टोरेज आणि कप होल्डर्ससोबत रियर आर्मरेस्ट फिचर्स देण्यात आले आहेत. 



Tata Harrier XZ


हे वेरियंट हॅरियर एसयूवीचं टॉप वेरियंट है। यामध्ये HID प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, कॉर्निंग फंक्शनसोबत फ्रंट फॉग लैम्प्स, शार्क फिन एंटीना, लेदर सीट्स, डोर पैनल्स, 8.8-इंचाचे  टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एम्प्लीफायरसोबत नऊ जेबीएल स्पीकर्स, 7-इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले, तीन टेरेन रेस्पॉन्स मोड्स, 6-एयरबैग्स, ESP, Isofix चाइल्ड सीट माउंट्स आणि हिल होल्ड व हिल डिसेंट कंट्रोल फीचर्स मिळणार आहेत. 


यासोबतच रोल ओवर मिटिगेशन, कॉर्नर स्टैबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हाइड्रोलिक ब्रेक असिस्ट आणि 60:40 फोल्डिंग सीट्स सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत.