मुंबई : ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने आता फ्यूचर मोबिलिटीवर पूर्णपणे फोकस करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांकडे आपलं लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ग्राहकांना आकर्षिक करत आहे. त्यामुळे कंपनी काही कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्या कार बंद केल्या नाही तरी ज्या गाड्यांचे सेल्स कमी झाला आहे त्या कार या वर्षी बंद करण्यात येणार आहे. 


तसेच काही कंपन्या आपल्या पोर्टफोलिओत बदल करणार आहे. या अगोदर मारूती ते ह्युंडाई सारख्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओत बदल झाला आहे. 


का बंद होणार या कार 


ऑटोमोबाइल कंपनी आपल्या स्ट्रेटेजीमध्ये बदल करत आहे. ऑटो एक्सपोमध्ये कंपन्यांनी इलेक्ट्रिक मॉडेल सादर केला असून आता स्पष्ट झालं आहे की कंपन्यांच फोकस याच सेगमेंटकडे आहे. पुढे जाण्यासाठी कंपन्यांनी काही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आङे. 2018 मध्ये या गाड्या बंद होतील 


कोणत्या कंपन्या करणार कार बंद 


2018 मध्ये टाटा आणि महिंद्रा आपल्या पोर्टफोलिओत बदल करणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या 3 - 3 मॉडेल्स बाजारात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. 


टाटा इंडिका


टाटाची सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त विकणारी कार म्हणजे टाटा इंडिका. मात्र कंपनीने टिआगो मॉडेल लाँच केल्यानंतर टाटा इंडिकाला बंद करत आहे. नुकतच कंपनीने टाटा टिआगोचं इलेक्ट्रि वर्जन शोकेस केलं होतं. म्हणून कंपनी आपलं पूर्ण लक्ष या कारकडे देत आहे. अशातच टाटा इंडिका 2018 मध्ये बंद करत आहे. जानेवारी कंपनीने इंडिका आणि विस्टा सारख्या कार फक्त 214 युनिट विकल्या आहेत. 


टाटा बोल्ट 


टिआगो आणि टिगोर सारख्या कार लाँच केल्यानंतर टाटा बोल्ट कंपनीच्या सेल्समध्ये कमतरता जाणवली आहे. या तिन्ही गाड्या एकाच सेगमेंटमधील असून यांच्या किंमती देखील एकाच दरातील आहे. बोल्टचा सेल्स फक्त 200 यूनिट असून कंपनी आता सर्व कारचे प्रमोशन करत आहे. 


टाटा इंडिगो 


टाटा जेस्टच्या येण्यानंतर इंडिगोची विक्री देखील कमी पडली आहे. कंपनीचा फोकस आता नव्या मॉडेल्सवर आहे. टाटा जेस्टचं नवं वर्जन घेऊन येत आहे. टाटा मोटर्सने इंडिगोला घेऊन भरपूर प्रमोशन केलं आहे. तसेच इंडिगोच्या नव्या वर्जनला देखील लाँच करणार आहे. म्हणून कंपनीचा सर्व फोकस तिकडे आहे. 


आता जाणून घेऊया महिंद्रा आपल्या कोणत्या कारला बंद करणार आहे 


महिंद्रा नूवोस्पोर्ट 


महिंद्रा कंपनी देखील पोर्टफोलिओ बदलत आहे. नूवोस्पोर्टची रीब्रांडिंग सारखी कार बाजारात आणली होती मात्र तेवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. नूवोस्पोर्ट भारतीय बाजारात सपसेल फेल झाली आहे. कारची फक्त 250 यूनिट बंद केल्या आहेत. 


महिंद्रा वेरिटो 


महिंद्रा देखील आता इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस केला आहे. आता महिंद्रा इलेक्ट्रिक मॉडल्सच्या कंपन्यांच्या पुढे आहे. अशात कंपनी आता वेरिटोला बंद करत आहे. गेल्या वर्षी वेरिटोची विक्रा काही खास झाली नाही. त्यामध्ये फक्त 300 यूनिट्स गाड्याच विकल्या गेल्या. 


महिंद्रा झायलो 


2009 मध्ये लाँच केलेली झायलो ही कार आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. सुरूवातीच्या काळात ही कार ग्राहकांच्या पसंतीची कार होती मात्र त्यानंतर त्याची विक्री ढासळली 2018 मध्ये ही कार आता बंद होत आहे. कंपनी आता TUV 500 ही कार लाँच करत आहे.