नवी दिल्ली : टाटा मोटर्सने नवीकोरी हॅचबॅक कार बाजारात आणली आहे. 'अल्ट्रॉज' (Altroz) असं या नव्या कारचं नाव आहे. २०१८ मधील ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा या कारचं मॉडेल सादर करण्यात आलं होतं. या कारसाठी खास डिझाईन तयार करण्यात आलं असून, त्याचा लूक फारच आकर्षक आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या कारमध्ये ऑटो गिअरचा पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र भविष्यात ऑटो गिअरचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. या कारची किंमत ५ ते ८ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. 


Tata Altroz कार XE, XM, XT, XZ, XZ(O) या व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असणार आहे. टाटाच्या या कारची बाजारात आधीपासूनच असलेल्या प्रीमियम कॅटेगरी हॅचबॅक कार मारुती बलेनो, टोयोटा, हुंदाई i20 शी टक्कर असणार आहे. 'अल्ट्रॉज'ची इंधन क्षमता ३७ लीटर इतकी आहे. 



Altroz कारला प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, फ्रन्ट आणि रियर फॉग लॅम्प आणि रियर डिफॉगर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसंच चारही बाजूला अजेस्ट होणारी ड्रायव्हर सीट आणि दोन बाजूला अजेस्ट होणारी फ्रन्ट पॅसेंजर सीट देण्यात आली आहे. कारमध्ये ऍन्ड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह ७ इंची फ्री स्टँडिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टमही आहे. शिवाय पॉवर विंडो, इंजिन पुश बटण स्टार्ट/स्टॉप, फास्ट चार्जिंग, स्मार्ट की, इलेक्ट्रिक टेलगेट, क्रूज कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपरसह इतरही फिचर्स देण्यात आले आहेत. 


सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एयरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेन्सर्स, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, isofix child seat mounts, कॉर्नरिंग फॉग लॅम्प यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 



टाटा अल्ट्रॉजची बुकींग ४ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. २१ रुपयांवर टाटा अल्ट्रॉजच्या अधिकृत वेबसाईटवरुन कारची बुकींग केली जाऊ शकते. अल्ट्रॉजचं मार्केट लॉन्चिंग पुढील वर्षात जानेवारीपासून होईल, त्याचवेळी या कारच्या किंमतीची घोषणा होणार आहे. सध्या या कारची एक्स शोरुम किंमत ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.