मुंबई : मिठापासून ते स्टीलपर्यंत उत्पादन करणाऱ्या टाटा या कंपनीने आपले सुपर अॅप लाँच केले आहे. टाटाचे सुपर अॅप Tata Neu आता लाईव्ह झाले आहे. हे अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे कंपनी Amazon, Flipkart, Paytm आणि इतर सुपर अॅप्सशी स्पर्धा करणार आहे. Tata Neu वर अनेक सेवा युरर्सला मिळणार आहेत. UPI पेमेंटपासून ते हॉटेल किंवा फ्लाईट बुकिंग, किराणा सामान खरेदीपर्यंत इतर अनेक पर्याय तुम्हाला येथे मिळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेदीवर, हे अॅप रिवॉर्ड म्हणून Neu Coins देत आहे. एका Neu नाण्याचे मूल्य 1 रुपये इतके आहे. तुम्ही Google Play Store आणि Apple App Store वरून Tata Neu अॅप डाउनलोड करू शकता. टाटाने गेल्या आठवड्यात या अॅपची घोषणा केली. 


पेमेंट सेवा


टाटा पेच्या मदतीने तुम्ही ब्रॉडबँड, वीज, गॅस, लँडलाइन, मोबाईल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्ज करू शकता. UPI ​​पेमेंटचा पर्यायही मिळेल. म्हणजेच UPI चे फीचर देखील Tata Pay सोबत जोडण्यात आले आहे. याच्या मदतीने कार्ड, नेट बँकिंग आणि UPI सेवांद्वारे पेमेंट उपलब्ध होणार आहे.


गुंतवणूक


तुम्ही Tata Neu अॅपवरही गुंतवणूक करू शकता. यामध्ये, झटपट वैयक्तिक कर्जापासून ते डिजिटल सोने, विमा आणि इतर अनेक विशेष योजना उपलब्ध आहेत. होम अवे सिक्योर प्लॅन, कार्ड फ्रॉड सिक्योर प्लॅन यांसारख्या योजनाही यावर उपलब्ध आहेत.


किराणा आणि फूड


तुम्हाला Tata Neu वर फूड डिलिव्हरीचा पर्याय देखील मिळेल. यामध्ये टाटाच्या ताज ग्रुपच्या हॉटेल्समधून जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय असेल. टाटाच्या या अॅपवर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. यामध्ये Neu Coins दिले जात आहेत, जे तुम्ही खरेदी करताना रिडीम करू शकता.


या अॅपवर तुम्हाला Big Bakset, Croma, Tata CliQ, Westside आणि Tata 1Mg वर देखील प्रवेश मिळेल. वापरकर्ते TATA IPL सामना विनामूल्य पाहू शकतात. यासाठी युजर्सला Neu Quiz चे उत्तर द्यावे लागेल, जे Tata Neu Instagram हँडलवर पोस्ट केले जाईल. अशा प्रकारे युजर्स सामन्याची तिकिटे जिंकू शकतात.