नवी दिल्ली : सध्या भारतात इंटरनेटचा खूप वापर होत आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होम केल्यामुळे ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी वाढली आहे. टाटा स्काय ब्रॉडबँडने आपल्या ग्राहतांसाठी चांगली ऑफर आणलीय. आता कंपनी नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नि: शुल्क वाय-फाय राउटर देत आहे.कनेक्शनच्या प्लानवर मोफत राऊटर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा स्काय ब्रॉडब्रॅण्ड नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लान घेऊन आलीय. यानुसार टाटा स्काय आपल्या ग्राहकांना मोफत वायफाय राऊटर देतेय. यावर सर्व नियम आणि अटी लागू असणार आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. 



वर्क फ्रॉम होम सुरु असताना असंख्य ग्राहकांना टेलीकॉम सर्व्हीस प्रोवायडर्स फास्ट इंटरनेट स्पीड देतायत. या स्पर्धेत टाटा स्काय ब्रॉडबॅंड देखील आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना 300Mbps स्पीड डेटा दिलाय.


कंपनीने सर्व ब्रॉडबॅंड कनेक्शनसाठी मोफत एक्सपर्ट इंस्टॉलेशन ऑफर केलंय. याआधी BSNL, Reliance Jio आणि Airtel ने देखील ब्रॉडबॅंड प्लान्स घेऊन बाजारात उतरल्यायत. बाजारातील इंटरनेट कनेक्शन्सची मागणी पाहता Vi ने देखील ब्रॉडबॅंड सेवा सुरु केलीय.