5000mAh बॅटरीचा स्मार्टफोन फक्त 6 हजार 499 रुपयांमध्ये, 3 कॅमेरे, मोठ्या डिस्प्लेसह बरंच काही
चला जाणून घेऊ या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन
मुंबई : फ्लिपकार्टच्या बिग बिलियननंतर, आता फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल आजपासून (17 ऑक्टोबर) सुरू झाला आहे. याचा लाभ ग्राहक 23 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकतात आणि ग्राहकांना यामध्ये इलेक्टॉनिक गॅझेटपासून ते फोनवर मोठ्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बिग बिलियन डेज चुकवला असेल तर, ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुम्हाला कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु घ्यायची असेल तर या सेलचा लगेच फायदा घ्या.
खरेतर Infinix चा स्वस्त फोन म्हणजे Infinix Smart 5A हा फोन अतिशय स्वस्तात या सेलमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. या सेलमध्ये ग्राहक हा फोन फक्त 6 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
तसे पाहाता हा फोन 6 हजार 999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. चला जाणून घेऊ या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन
- Infinix Smart 5A मध्ये 6.52-इंच HD + LCD IPS इन-सेल डिस्प्ले आहे.
- स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे, स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.5%आहे.
- हा फोन Android 11 वर आधारित XOS 7.6 वर काम करतो.
- फोनमध्ये Eye Care मोड देण्यात आला आहे.
हा फोन 1.8 GHz ऑक्टा-कोर MediaTek Helio A20 प्रोसेसरसह येतो. हा फोन सिंगल व्हेरिएंट 2 जीबी रॅम + 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये सादर करण्यात आला आहे. ग्राहक मायक्रोएसडी कार्डद्वारे त्याचे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात.
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा
कॅमेरा म्हणून, या नवीन Infinix Smart 5A मध्ये 8-मेगापिक्सलचा ड्युअल AI आणि डेप्थ सेन्सर आहे.
ट्रिपल एलईडी फ्लॅश, पिक्चर मोड, ऑटो सीन डिटेक्शन, कस्टम बोकेह आणि AI 3D ब्यूटी सारखे मोड फोनमध्ये उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, Infinix च्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पावरसाठी, Infinix Smart 5A मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 a / b / g / n, GPS, GPRS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
या बजेट फोनमध्ये, वापरकर्त्यांना फिंगरप्रिंट सेन्सर, एम्बियंट लाइट सेन्सर, जी-सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात.