Apple Wonderlust Event 2023: जगभरातील आयफोन युजर्ससाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. Apple आपल्या Wonderlust कार्यक्रमात iPhone 15 सीरिज लाँच करणार आहे. संध्याकाळी उशीरा म्हणजे भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता या कार्यक्रमाला कंपनीचं क्यूपर्टिनो इथं असलेल्या मुख्यालयात सुरुवात होईल. या कार्यक्रमात केवळ आयफोन 15 सीरिजच नाही तर कंपनी अनेक मोठ्या घोषणा करणार असून सर्व जगाच्या नजरा या कार्यक्रमावर लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Wonderlust मध्ये काय खास?
Apple च्या Wondrelust कार्यक्रमांच मुख्य आकर्षण असेल ते iPhone 15 सीरिजचं लॉन्चिंग. यात iPhone 15, 15 Plus, 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या फोनचा समावेश आसेल. iPhone 15 आणि 15 Plus या फोनला अॅल्युमिनिअम एजेस असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर 15 प्रो व्हेरिएंटमध्ये  टाइटेनियम डिझाईन असण्याची शक्यता असून हा फोन वजनाने हलका आणि मजबूत असेल तसंच याची किंमतही जास्त असेल. 


iPhone 15 चे फिचर्स
आयफोन प्रो मॉडेल्स 3-नॅनोमीटर प्रक्रियेवर तयार केलेल्या नवीन A17 चिपसेटने अद्ययावत असेल. ज्यामुळे फोनचा वेग आणि बॅटरीचं आयुष्य जास्त असेल. याव्यतिरिक्त, Apple ने स्क्रीनच्या सभोवतालचं बेझल अधिक पातळ करण्यासाठी आणि स्क्रीनचा आकार वाढवण्यासाठी प्रो व्हेरियंटवर LIPO किंवा लो इंजेक्शन प्रेशर ओव्हरमोल्डिंग नावाची उत्पादन प्रक्रिया वापरली असल्याचं सांगितलं जात आहे. 


iPhone 15 ची किंमत
Phone 15 आणि iPhone 15 Plus च्या किमतींबाबत अद्याप अनिश्चितता आहे. iPhone 15 त्यांची  नेहमीची बेस प्राईज 79,900 रुपयांपासून सुरू होईल असा दावा केला जात आहे. iPhone 15 Plus ची किंमत 89,900 रुपये असू शकते. ही किंमत केवळ अंदाज आहे.  iPhone 15 लाँच करेपर्यंत अधिकृत किमती जाहीर केल्या जाणार नाहीत.


iPhone 15 Pro आणि Pro Max/Ultra च्या किमती आधीच वाढू शकतात. अहवालात असे दिसून आले आहे की प्रो मॉडेलची किंमत $100 आणि प्रो मॅक्सची किंमत $200 ने वाढू शकते. यूएस मार्केटमध्ये, iPhone 15 Pro ची किंमत $999 (रु. 82,900) वरून $1,099 (रु. 91,200) पर्यंत वाढू शकते. पण अमेरिकन मार्केटच्या तुलनेत भारतीय बाजारात हा फोन थोडा जास्त महागात विकला जातो.


iPhone 15 Pro आणि Pro Max/Ultra च्या किमती वाढू शकतात. प्रो मॉडेलची किंमत $100 आणि प्रो मॅक्सची किंमत $200 ने वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यूएस मार्केटमध्ये, iPhone 15 Pro ची किंमत $999 (रु. 82,900) वरून $1,099 (रु. 91,200) पर्यंत असू शकते. पण अमेरिकन मार्केटच्या तुलनेत भारतीय बाजारात हा फोन थोडा जास्त महागात विकला जातो.


iPhone 14 Pro ची भारतातील किंमत US $999 म्हणजे साधारण  99,900 रुपये असायला हवी होती. पण सीमाशुल्क आणि ब्रँड मूल्यासह इतर विविध कारणांमुळे, Apple ने भारतात आयफोन 14 प्रो 1,29,900 रुपयांच्या किंमतीला लॉन्च केला.  म्हणजेच iPhone 15 Pro ची भारतातील किंमत 1,29,900 रुपयांपासून 1,39,900 रुपयांपर्यंत असू शकते. 


iPhone 15 Pro Max/Ultra ची किंमत गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल, म्हणजे $1,099 (अंदाजे रु 91,200) वरून $1,299 (अंदाजे रु 1,08,000) पर्यंत वाढू शकते. किंमत वाढल्यास भारतात iPhone 15 Pro Max ची किंमत 1,39,900 रुपयांवरून 1,59,900 रुपयांपर्यंत असू शकते. ही वाढ 20,000 रुपयांची आहे. पण किमतीची खरी माहिती आयफोन लॉन्च झाल्यानंतर समोर येईल.