गुगलचा पासवर्ड विसरलात? मग तुमच्यासाठीच आलाय हा नवीन फीचर! कसं काम करणार ते जाणून घ्या
गुगल अकाऊंटवर लॉग-इन करण्यासाठी पासवर्ड टाकण्याची प्रथा लवकरच बंद होणार आहे. पासवर्ड लक्षात ठेवण्याची समस्या असणाऱ्यांसाठी गूगलने आता नवं फिचर आणलं आहे. हे फिचर प्रत्येकाला आवडेल असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे.
Google Passkeys New Features: गुगल अकाऊंटवर साइन-इन करण्यासाठी आता तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही. पासवर्ड (Password) लक्षात ठेवण्याची कटकटच आता कायमची संपणार आहे. आता तुम्ही विचार कराल अकाऊंटला पासवर्ड टाकला नाही तर ते अकाऊंट (Google Account) सुरक्षित कसं राहिल. पण याची चिंताही करावी लागणार नाही. कारण गुगलने युजर्ससाठी जबरदस्त फिचर आणलं आहे. गुगल ब्लॉगपोस्टने दिलेल्या माहितीनुसार गुगल अकाऊंटवर साईन-इन करण्यासाठी आता पासवर्डऐवजी पासकीजचा वापर केला जाणार आहे.
गुगलचं क्रांतीकारी पाऊल
गुगलने एक क्रांतीकारी बदल केल आहे. नव्या बदलानुसार अकाऊंटसाठी पासवर्डची गरज भासणार नाही. Google Passkeys च्या माध्यमातून आपोआप तुमचं अकाऊंट तुम्ही उघडू शकता आणि ते सुरक्षितही ठेऊ शकता. गुगलने नोटीफिकेशनद्वारे आपल्या युजर्सना पासकीजबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
नोटीफिकेशनमध्ये युजर्सन Google Passkeys चा वापर कसा करावा याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जर का तुम्हाला नोटीफिशेकन आलं नसेल तर तर आम्ही तुम्हाला सांगतो Google Passkeys कसं काम करतं. त्याआधी जाणून घेऊया पासकीज म्हणजे काय?
काय आहे पासकिज?
पासवर्डच्या तुलनेत पासकीज जास्त सुरक्षित असल्याचा गुगलचा दावा आहे. पासकीजच्या माध्यमातून तुम्ही बायोमेट्रिक सेन्सर (चेहऱ्याची ओळख/फिंगरप्रिंट), पॅटर्न किंवा पिन वापरून तुमचं अकाऊंट लॉग-ईन करु शकता. यामुळे गुगल पासकीज हे फिचर हॅकिंग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल
आपण अनेकवेळा पासवर्ड बदलत असंत. पण काही वेळा आपण अकाऊंटचा पासवर्डचं विसरुन जातो. पण पासकीज फिचरमुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची समस्या कायमची मिटणार आहे. पण घाबरू नका पासवर्डची पद्धत कायमची बंद होणार नाही. गुगलने पासवर्ड किंवा पासकिजचा पर्याय निवडण्याचा निर्णय युजर्सवर सोपवला आहे.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार पासकीज फिचरबाबत युजर्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतायत. त्यामुळेच गुगल अकाऊंटसाटी डिफॉल्ट स्वरुपात पासकीज फिचरची सुरुवात केली जाणार आहे. 64 टक्के लोकांनी पासकीज फिचर पासवर्डपेक्षा जास्त सोप आणि सुरक्षित आहे असं म्हटल्याचा दावा गुगलने केलाय.
Google Passkeys असं करा क्रिएट
गुगल अकाऊंटवर पाकसीज सेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी visit g.co/passkeys वर जावं लागले. इथं तुम्हाला Get Passkeys चा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर दिसणाऱ्या सोप्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. पासकीजचा वापर गुगल अॅप म्हणजे युट्यूब, सर्च, मॅप्स यासाठी करता येणार आहे.