Common Charger for Mobile : चार्जरबाबत मोबाईल कंपन्यांची मनमानी आता संपणार आहे. युरोपमध्ये आता मोबाइल कंपन्यांना सर्व स्मार्टफोनसाठी (Smartphone) कॉमन चार्जरचा (Common Charger) नियम पाळावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार, USB-C टाईपचा चार्जर सर्व मोबाइलसाठी कॉमन चार्जर असेल. भारतात सध्या हा नियम लागू झालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 मध्ये लागू होणार नियम
2024 च्या अखेरपर्यंत सर्वा स्मार्टफोन, टॅबलेट्स आणि कॅमेरामध्ये USB-C चार्जिंग पोर्ट दिला जाईल. या संदर्भात युरोप संसदेने एक नियम पारित केला आहे. कॉमन चार्जरच्या बाजूने 602 मतं पडली तर विरोधात फक्त 13 मतं पडली.


याचा सर्वाधिक परिणाम अॅपल फोनवरही (apple phone) होणार आहे. अॅपल कंपनीचा सामान्य चार्जर नियमाला विरोध आहे. कंपनी सध्या आयफोनसाठी लाइटनिंग पोर्ट ( lightning cable) देते. तर बहुतेक मोबाईल कंपन्या USB-C पोर्ट वापरतात.


भारतातही लवकरच नियम
कॉमन चार्जर चार्जरचा नियम भारतात आणण्याचीही चर्चा सुरू आहे. भारत सुरुवातीला दोन प्रकारच्या चार्जरला मान्यता देण्याचा विचार करत आहे. कारण, देशात कॉमन चार्जर नियम लागू करणे कठीण होऊ शकते असं ग्राहक व्यवहार सचिवांचं म्हणणं आहे. यासंदर्भात भारतातील तज्ज्ञ लोकांची चर्चा सुरू आहे. यात पहिलं पोर्ट सी-टाईप (C Type Charger) असेल. दुसऱ्या पोर्टबाबत चर्चा सुरु आहे. युरोपमधील सर्व उपकरणांसाठी टाइप-सी चार्जिंग पोर्ट उपलब्ध असेल.
 
हा नियम लागू झाल्यास अॅपल कंपनी काय निर्णय घेते, हे पाहण्यासारखं असेल. या निर्णयानंतर एकतर कंपनी चार्जिंग पोर्ट बदलू शकते किंवा यूरोपमध्ये आपल्या फोनची विक्री थांबवू शकते.