मुंबई : आपल्यापैकी अनेक लोकं दररोज कंप्यूटर वापरतात. परंतु आपल्याला रोज वापरत असलेल्या या कंप्यूटरच्या कीबोर्डमधील काही Short Cuts आपल्याला माहित नसतात किंवा कीबोर्डमधील काही Key कशासाठी असतात? त्यांचा वापर कशासाठी होतो? हे देखील काहीजणांना माहित नसते. त्यामुळे हे Key कशासाठी वापरतात आणि कसे वापरतात? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

F1: कंप्यूटर चालू करताना जर तुम्ही F1 दाबालात तर तुम्ही कंप्यूटर सेटअपव पोहोचाल. तुम्हा येथून तुम्ही तुमच्या कंप्यूटरच्या सेटिंग्ज तपासू आणि बदलू शकता.


F2: F2 ही  Key विंडोज ऑपरेटिंग सिस्टममधील फाइलचे नाव बदलण्यासाठी वापरली जाते. इतकेच नाही तर मायक्रोसॉफ्ट वर्डमधील F2 Key दाबून तुम्ही एखाद्या फाईलचे प्रिंट प्रिव्ह्यू देखील पाहू शकता.


F3: विंडोजमधील F3 Key वापरून सर्च बॉक्स उघडता येते. F3 Key दाबल्यानंतर, आपण कोणतीही फाईल किंवा फोल्डर शोधू शकता. दुसरीकडे, MS-DOSमध्ये F3 दाबून पूर्वी टाइप केलेली कमांड पुन्हा टाईप केली जाईल.


F4: मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर या Key ला दाबले, तर मागील काम पुन्हा सुरू होते. म्हणजेच, आपण यापूर्वी टाइप केलेला शब्द पुन्हा टाइप केला जाईल किंवा अशा कोणत्याही कामाला तुम्हा रीपीट करु शकता.


F5: कंप्यूटर रीफ्रेश करण्यासाठी सामान्यतः F5 चा वापर केला जात असला तरीही, हे बटण दाबून पॉवरपॉईंटचा स्लाइड शो देखील सुरू होतो.


F6: कीबोर्डवरील की दाबून, विंडोजमधील खुल्या फोल्डर्समधील कंटेन्ट दिसू लागते. या व्यतिरिक्त, MS Word मधील अनेक कागदपत्रे पाहण्यासाठी Control+Shift+F6 दाबून केले जाते.


F7: आपण  MS Word मध्ये F7 दाबल्यानंतर तुम्ही जे काही टाइप कराल त्याचे स्पेलिंग चेक होते.


F8: MS Wordमधील मजकूर निवडण्यासाठी F8 वापरला जातो.


F9: Microsoft Outlookमध्ये ई-मेल पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी F9 वापरला जातो. त्याच वेळी, बर्‍याच नवीन सिस्टम्समध्ये या  Key च्या मदतीने स्क्रीनचा ब्राइटनेसला देखील नियंत्रित केले जाऊ शकते.


F10: तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना ही  Key दाबलीत तर मेनू उघडेल. या व्यतिरिक्त, Shift+F10 दाबले तर, ते माउसच्या राईट क्लिकसारखे काम करते.


F11: F11 चा वापर इंटरनेट ब्राउझरमध्ये पूर्ण स्क्रीन पाहण्यासाठी केला जातो.


F12: MS Wordमध्ये F12 दाबून  Savs Asचा पर्याय उघडेल.  Shift+F12 दाबल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह होते.