NoMoPhobia Research : अन्न, पाणी आणि निवारा या तीन मुलभूत गरजांमध्ये आता मोबाईलचाही (Mobile) समावेश झाला आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचा हातात आता मोबाईल आला आहे. मोबाईल हा आता प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. इतकंच काय तर मोबाईल शिवाय राहाणं ही कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही. याचसंदर्भात एक अहवाल (Report) प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल जितका चिंताजनक आहे तितकाच विचार करायला लावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे अहवालात?
Oppo आणि काऊंटरपॉईंट रिसर्चने (Counterpoint Research) एक अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी काही निरिक्षणं नोंदवली आहेत. भारतातील चार प्रत्येकी चार माणसांमागे तिघांना NOMOPHOBIA जडला आहे. देशातील 72 टक्के लोकं अशी आहेत ज्यांना मोबाईलची बॅटरी 20 टक्के झाल्यावर 'लो बॅटरी एंजायटी' होऊ लगाते. तर 65 टक्के लोकांना अस्वस्थता, असहाय्यता, भीती वाटू लागते. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर तुम्ही देखील  NOMOPHOBIA ने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. 


NOMOPHOBIA म्हणजे काय?
नोमोफोबिया म्हणजे नो मोबाईल फोन फोबिया. ही एक अशी स्थिती आहे ज्यात त्या व्यक्तीला मोबाईल आपल्यापासून थोडावेळ जरी दूर असला तरी भीती वाटायला लागते. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे मनुष्य मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेलाय.


चिंताजनक अहवाल
चायनाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी Oppo आणि काऊंटरपॉईंट नामक रिचर्स कंपनीने एक अभ्यास केला होता, ज्याचं नाव 'NoMoPhobia : Low Battery Anxiety Consumer Study' असं ठेवण्यात आलं. या अभ्यासातून समोर आलेली माहिती चिंताजनक आहे. 47 टक्के लोकं अशी आहेत जी आपला स्मार्टफोन दिवसातून दोनवेळा चार्ज करतात. तर 87 टक्के लोकं अशी आहेत जी मोबाईल फोन चार्जिंगला असतानाही त्याचा वापर करतात. अभ्यासानुसार स्मार्टफोनची बॅटरी कमी झाल्यावर 74 टक्के महिला तणावाखाली येतात. तर 82 टक्के पुरुषांची हीच स्थिती आहे. 62 टक्के लोकं अशी आहेत जी मोबाईल बॅटरी लवकर संपत असल्याने आपला मोबाईलच बदलतात. 92.5 लोकं अशी आहेत जी आपल्या मोबाईलची बॅटरी जास्त वेळ चालावी यासाठी मोबाईलमधील पॉवर सेव्हिंग मोड ऑन ठेवतात. 40 टक्के लोकं आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट मोबाईलने करतात. 


Oppo इंजियाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ओप्पो इंडियाचे CMO दमयंत सिंह खनोरिया यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. या अहवालाच्या माध्यमातून ग्राहकांची पसंती आणि त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला गेलाय. त्याद्वारे स्मार्टफोनमध्ये बदल केले जाऊ शकतात. मोबाईलची बॅटरी लो झाल्यावर काळजी वाटू लागणाऱ्यांमध्ये 31 ते 40 वयोगटातील लोकं जास्त आहेत. तर 25 ते 30 वयोगटातील तरुण वर्गही या मोडतो.