मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवनवीन फिचर्ससह अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत मिळतात. तुम्ही जर स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्हाला स्मार्टफोन खरेदीवर मोठी कॅशबॅक मिळणार आहे. पेटीएम-मॉल स्मार्टफोनवर कॅशबॅक देत आहे. स्मार्टफोन खरेदीवर तुम्ही ९ हजारापर्यंतची बचत करू शकता. पेटीएम मॉलवर तुम्हाला सॅमसंग, अॅपल, गूगल, शाओमी, ओप्पो, मोटोरोला आणि अन्य कंपनीचे स्मार्टफोन्सचे पर्याय उपलब्ध आहेत.


आयफोन एक्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅपल आपल्या आयफोन एक्सवर 7500 हजारांची सूट देत आहे. ही सूट फक्त 64 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनसाठीच आहे. या स्मार्टफोनची मूळ किमंत ९९ हजार ५९५ रूपये आहे. पण तुम्हाला सुट दिल्यानंतर हा फोन फक्त ९२ हजार ९६ रूपयात मिळेल.


सॅमसंग गॅलेक्सी नोट 9


तुम्हाला जर सॅमसंगचा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर, ही डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सॅमसंग गॅलेक्सीची किंमत 67.900 इतकी आहे. या स्मार्टफोनवर 9000 हजारांची मोठी सूट आहे. सुटनंतर हा समार्टफोन तुम्हाला 58 हजार 900 रुपयात मिळेल.


गूगल पिक्सेल 3 


गूगल पिक्सेल 3 हा अगदी नवा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनसाठी पेटीएम मॉल 6 हजार रुपयांची कॅशबॅक देत आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 63 हजार 799 रुपयाला खरेदी करु शकता.


सॅमसंग गॅलेक्सी एस 9 प्लस


सॅमसंग गॅलेक्सी एस 9 प्लसची किंमत पेटीएम मॉलवर 57 हजार 400 इतकी आहे. यावर 4 हजार 500 रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅकची रक्कम वजा करता तुम्हाला हा स्मार्टफोन 52 हजार 900 रुपयांना मिळेल.  


आयफोन 7 


पेटीएम मॉल आयफोन 7 वर 3 हजार रुपयांची कॅशबॅक देत आहे. 32 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन तुम्ही 36 हजार 672 रुपयात खरेदी करु शकता. 


गूगल पिक्सेल 2 एक्सएल


गूगल पिक्सेल 2 एक्सएल स्मार्टफोन तुम्हीव 37 हजार 499 रुपयात खरेदी करु शकता. या स्मार्टफोनवर पेटीएम 4500 रुपयांच कॅशबॅक देत आहे. स्मार्टफोनची किंमत 45 हजार 499 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनवर 8 टक्के सूट मिळणार आहे.