नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदी करताना अधिकतर ग्राहक कॅमेराच्या क्वॉलिटीकडे लक्ष देतात. त्यामुळे सर्व स्मार्टफोन कंपन्या आपल्या कॅमेराला अधिक अॅडव्हान्स करण्याच्या प्रयत्न करत आहेत. आता बाजारात ट्रीपल कॅमेराचा ट्रेंड आहे. Vivo, SAMSUNG, Huawei या कंपन्यांनी आधीच ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तुलनेने हे स्मार्टफोन महाग आहेत. आता Tecno ने भारतातील सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात हा फोन CAMON i4 या नावाने लॉन्च केला जाणार आहे. या फोनची किंमत १० ते ११ हजारांपर्यंत असणार आहे. हा स्मार्टफोन लॉन्च केल्यास हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.


CAMON i4 हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड ९.० वर काम करेल. कंपनीकडून वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफरही दिली जाण्याची शक्यता आहे. हा फोन ड्यूअल सिम असून मायक्रो एसडी कार्डसाठी वेगळा स्लॉट देण्यात येणार आहे. हा फोन Transsion Holdings या चायनीज कंपनीचा आहे. ही कंपनी भारतात वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सनी आपले फोन विक्रीसाठी आणते. कंपनीकडून ऑफलाइन मार्केटमध्ये अधिक लक्षकेंद्रीत केले जाते. कंपनीने कमी वेळात भारतीय बाजारात चांगले शेअर मिळवले आहेत.